लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना काही तासांमध्येच सुरुवात होणार आहे. पण या स्पर्धेत भारताच्या महिला बॉक्सिंगपटू निखत झरीन आणिलव्हलिना यांना पदकाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. कारण त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी स्पर्धा सुरु होण्यापूर्वी समोर आली आहे.

वाचा-CWG 2022 : भारतीय महिला संघाला पहिल्या सामन्यापूर्वी मिळाली आनंदाची बातमी, पाहा काय घडलं

जागतिक चॅम्पियन निखत झरीन आणि विद्यमान ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती लव्हलिना बोरगोहेन यांना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महिला बॉक्सिंग स्पर्धेच्या आपापल्या पहिल्या लढतीत सहज ड्रॉ मिळाले आहेत. निखत रविवारी मोझांबिकच्या हेलेना इस्माईल बागाओविरुद्ध महिलांच्या ४८-५० किलो वजनाच्या लाईट फ्लायवेट प्रकारात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या विजयानंतरही तिची उपांत्यपूर्व फेरीत दुसरी सोपी लढत होणार आहे. कारण तिचा सामना वेल्सच्या हेलन जोन्सशी होईल. लोव्हलिना शनिवारी तिच्या मिडलवेट ६६-७० किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या एरियन निकोल्सनशी लढेल आणि ही लढत जिंकल्यानंतर तिचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना गोल्ड कोस्टच्या रौप्यपदक विजेत्या वेल्सच्या रोझी ऍसेल्सशी होईल, तिला पहिल्या फेरीत बाय मिळाला होता.

वाचा-पहिला ट्वेन्टी-२० सामना सुरु होण्यापूर्वी भारताला दोन मोठे धक्के, रोहित शर्माची चिंता वाढली…

महिलांच्या अन्य गटांमध्ये चमेलीला पहिल्या फेरीत बाय मिळाला आणि रिंगमध्ये थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पण तिला खडतर आव्हानाचा सामना करावा लागणार आह. तिचा सामना ४ ऑगस्ट रोजी गोल्ड कोस्टमधील कांस्यपदक विजेत्या न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टेनशी होईल. महिलांच्या (४५-४८ किलो) लाइट फ्लायवेट प्रकारात नीतूला पदक निश्चित करण्यासाठी फक्त एक विजय आवश्यक आहे कारण ड्रॉमध्ये फक्त आठ बॉक्सर्स सामील आहेत. ३ ऑगस्ट रोजी उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना उत्तर आयर्लंडच्या निकोल क्लाइडशी होईल.

पुरुषांच्या विभागात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आणि २०१८ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेता अमित पंघल १ ऑगस्ट रोजी फ्लायवेट (४८-५१1 किलो) गटात वानुआतुच्या नम्री बेरीविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्याचवेळी, गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक विजेता मोहम्मद हुसामुद्दीन ३० जुलै रोजी त्याच्या सलामीच्या लढतीत फेदरवेट (५४-५७ किलो) गटात दक्षिण आफ्रिकेच्या अमजोले दाईशी लढेल. माजी आशियाई आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेता शिव थापा शुक्रवारी लाइट वेल्टरवेट (६०-६३.५ किलो) गटात पाकिस्तानच्या सुलेमान बलोचशी लढेल, तर वेल्टरवेट (६३.५-६७ किलो) बॉक्सर रोहित टोकसला पहिल्या फेरीत बाय मिळाला आहे. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना घानाच्या अल्फ्रेड कोटशी होईल. मिडलवेट (७१-७५ किलो) गटात पहिल्या फेरीतही फटकेबाजी करणाऱ्या सुमितची रविवारी दुसऱ्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या कॅलम पीटर्सशी लढत होईल. पुरुषांच्या हलक्या हेवीवेट (७५-८० किलो) गटात आशिष कुमारलाही पहिल्या फेरीत बाय मिळाला आणि १ ऑगस्ट रोजी दुसऱ्या फेरीत नियूच्या ट्रॅव्हिस तपाटुएटोआशी सामना होईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.