>> ज्युडोमध्ये आणखी एक पदक निश्चित- महिलाच्या ७८ किलो वजनी गटात भारताची तुलिका मान अंतिम फेरीत दाखल, ज्युडोमधील हे देशाचे तिसरे पदक ठरले. आज रात्री होणार फायनल
>> हॉकी- भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये दाखल
>> हॉकी, महिला- भारतीय महिला संघाचा कॅनडावर ३-२ असा विजय
>> वेटलिफ्टिंग- १०९ किलो वजनी गटात भारताच्या लवप्रीत सिंहला कांस्य पदक
>> हॉकी, महिला: भारत आणि कॅनडा यांच्यातील मॅच सुरू, भारताने १-० अशी आघाडी घेतली
>> वेटलिफ्टिंग- १०९ किलो वजनी गट- क्लीन अँड जर्क प्रकारात भारताच्या लवप्रीत सिंहने तिसऱ्या प्रकारात १९३ किलो वजन उचलले
>> वेटलिफ्टिंग- १०९ किलो वजनी गट- क्लीन अँड जर्क प्रकारात भारताच्या लवप्रीत सिंहने १८५ किलो वजन उचलले तर दुसऱ्या प्रयत्नात १८९ किलो
>> वेटलिफ्टिंग १०९ किलो वजन गट- स्नॅच फेरी संपली
>> वेटलिफ्टिंग- लवप्रीत सिंहने दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात १६१ आणि १६३ किलो वजन उचलले
>>वेटलिफ्टिंग- लवप्रीत सिंहने पहिल्या प्रयत्नात १५७ किलो वजन उचलले
>> वेटलिफ्टिंग- १०९ किलो वजनी गटात भारताचा लवप्रीत सिंह दावेदारी सादर करत आहे
>> भारताचे आजचे राष्ट्रकुल स्पर्धेतील वेळापत्रक