बर्मिंगहम : राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंवर सर्वांचे लक्ष लागून राहील. आजच्या स्पर्धेत देखील भारताला पदके मिळण्याची आशा आहे. त्याचसोबत आजपासून कुस्ती (रेसलिंग) स्पर्धेला देखील सुरुवात आहे आणि या खेळातील पदकासाठी मोठ्या दावेदारांपैकी एक असेल.

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मधील भारतीय खेळाडू आपल्या खेळांचे उत्तम प्रदर्शन करत भारताला सर्वाधिक पदके मिळवून देत आहे. राष्ट्रकुल स्पर्धेचा सातवा दिवस देखील भारतासाठी शानदार ठरला. मुख्यत्त्वे भारताने बॉक्सिंगमध्ये दमदार खेळ दाखवत ७ पदके निश्चित केली आहेत. तर पुरुष हॉकी संघाने पूलमध्ये अव्वल स्थान मिळवत अंतिम चार संघांमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. याशिवाय टेबल टेनिस, स्क्वॉश, पॅरा टेबल टेनिस या खेळांमध्ये दिग्गज खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली तर पॉवरलिफ्टिंगमध्ये निराशा पत्करावी लागली. तर याच आठव्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंवर सर्वांच्या नजरा आहेत. सोबतच आजपासून कुस्ती (रेसलिंग) स्पर्धेला देखील सुरुवात होणार आहे. या खेळामध्ये पदकासाठी भारत मोठ्या आणि प्रबळ दावेदारांपैकी एक असेल. तर आठव्या दिवशी देखील भारताला पदके मिळण्याची आशा आहे. चला मग जाणून घेऊया आजच्या आठव्या दिवसाचे पूर्ण वेळापत्रक.

अॅथलेटीक्स आणि पॅरा अॅथलेटीक्स
१०० मीटर महिला अडथळा शर्यत
पहिली फेरी – हीट 2: ज्योति याराजी – दुपारी ३:३० वाजता

महिला लांब उडी पात्रता फेरी
गट अ – एंसी एदापल्ली – ४:१० वाजता

महिला २०० मीटर उपांत्य फेरी
हिमा दास – रात्री १२:५३ वाजता (शनिवार)
पुरुषांची ४×४०० मित्रा रिले फेरी एक : ४:१९ वाजता

बॅडमिंटन (भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० पासून सुरू)
महिला दुहेरी उपउपांत्यपूर्व फेरी – त्रीशा जॉली आणि गायत्री गोपीचंद
पुरूष दुहेरी उपउपांत्यपूर्व फेरी – सात्त्विक साईराज रंकिरेड्डी आणि चिराग शेट्टी

महिला एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी – पी व्ही सिंधू, आकर्षी कश्यप
पुरूष एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी – किदांबी श्रीकांत

लॉन बॉल्स
महिला पेयर्स उपांत्यपूर्व फेरी – भारत विरुद्ध इंग्लंड दुपारी १ वाजता

स्क्वॉश
पुरुष दुहेरी उपउपांत्यपूर्व फेरी – वेलावन सेंथिलकुमार आणि अभय सिंह – संध्याकाळी ५:१५ वाजता
मिश्रित दुहेरी उपांत्यपूर्व फेरी
दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल – १२ वाजता (शनिवार)

टेबल टेनिस
मिश्रित दुहेरी उपउपांत्यपूर्व फेरी –
जी साथीयान ज्ञानसेकरन आणि मणीका बत्रा – दुपारी २ वाजता
मिश्रित दुहेरी उपउपांत्यपूर्व फेरी –
अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला – दुपारी २ वाजता

महिला एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी
श्रीजा अकुला – दुपारी ३:१५ वाजता
महिला एकेरी उपउपांत्यपूर्व फेरी
रिथ टेनिसन – दुपारी ३:१५ वाजता

हॉकी
महिला उपांत्य फेरी – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – रात्री १०:३० वाजता

कुस्ती (दुपारी ३:३० पासून सुरू)
पुरुष फ्रिस्टाइल १२५ किग्रॅ – मोहित ग्रेवाल
पुरुष फ्रिस्टाइल ६५ किग्रॅ – बजरंग पुनीया
पुरुष फ्रिस्टाइल ८६ किग्रॅ – दीपक पुनिया
महिला फ्रिस्टाइल ५७ किग्रॅ – अंशू मलिक
महिला फ्रिस्टाइल ८६ किग्रॅ – दिव्या काकरान
महिला फ्रिस्टाइल ६२ किग्रॅ – साक्षी मलिक

हायलाइट्स
– राष्ट्रकुल स्पर्धेच्या आठव्या दिवशी देखील भारताला फडके मिळण्याची आशा
– आजपासून कुस्ती स्पर्धेला सुरुवात
– कुस्ती स्पर्धेमध्ये पदकासाठी भारत मोठ्या दावेदारांपैकी एकSource link

Leave a Reply

Your email address will not be published.