सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर कमांडोंना पुण्यात सहा महिन्यांचे प्रशिक्षण:डीआयएटीमध्ये अत्याधुनिक सायबर अभ्यासक्रम तयार

सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सायबर कमांडोंना पुण्यात सहा महिन्यांचे प्रशिक्षण:डीआयएटीमध्ये अत्याधुनिक सायबर अभ्यासक्रम तयार

वाढत्या सायबर गुन्हेगारीला अाळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरुवातीच्या टप्प्यात ३५० सायबर कमांडाे तयार करण्याचे ठरवले अाहे. याकरिता सरकारने अायअायटी व अायअायअायटी यांच्याशी समन्वय साधून प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. यामधील ३५ वेगवेगळया वरिष्ठ पाेलीस अधिकारी, तपास अधीकारी यांना सहा महिन्यांचे निवासी अत्याधुनिक सायबर प्रशिक्षण पुण्यातील डिफेन्स इन्स्टिटयूट अँडव्हान्स टेक्नाॅलाॅजी (डीअायएटी) दिले जाणार असल्याची माहिती डीअायएटीचे कुलपती डाॅ.बीएचवीएस नारायणमूर्ती यांनी पत्रकार परिषदेत दिली अाहे. नारायणमूर्ती म्हणाले, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान प्रकरणात सायबर केसेस मध्ये जलद प्रतिसाद देणे, डिजीटल फाॅरेन्सिक मधील पायाभूत सुविधा सुरक्षित करण्यावर भर देण्यात येईल. सायबर गुन्हे कमी करण्याचे दृष्टीने यामाध्यमातून अागामी काळात प्रयत्न करण्यात येतील. देशात चार हजार ८६० अभियांत्रिकी महाविद्यालय असून त्यामध्ये डीअायटीचा ६३ वा क्रमांक असून पुण्यात पहिल्या स्थानावरी अभियांत्रिकी महाविद्यालय अाहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून कॅम्पस नाेकरी देण्याचे प्रमाण सध्या ७० टक्के असून ते १०० टक्के करण्याचा प्रयत्न अाहे. लष्करी साहित्याचे उत्पादन घेणाऱ्या अनेक कंपन्यांना काैशल्य अाधारित मनुष्यबळ गरज असते त्यानुसार एल अॅण्ड टी मदतीने प्रशिक्षण अभ्यासक्रम घेण्यात येत अाहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने १६ अाठवडयांचा अाॅनलाइन काेर्स सुरु करण्यात अाला असून त्यातून अातापर्यंत तीन हजारजणांना प्रशिक्षण देण्यात अाले अाहे. संशाेधकांसाठी एमटेक अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात येत असून त्यात एक वर्षाचे प्रशिक्षण डीअायटी मध्ये तर एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम डीअारडीअाेत घेतला जाणार अाहे. दीक्षांत समारंभाचे अायाेजन डीअायटी मार्फत सात सप्टेंबर राेजी एमटेक अभ्यासक्रामचे विद्यार्थ्यांचे दीक्षांता समारंभ कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. यंदाच्या वर्षी २२७ विद्यार्थ्यी एमटेकची पदवी प्राप्त करणार असून २३ जणांनी पीएचडी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला अाहे. या कार्यक्रमासाठी संरक्षण विभागाचे सचिव डाॅ.समीर कामत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अाहे.

​वाढत्या सायबर गुन्हेगारीला अाळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरुवातीच्या टप्प्यात ३५० सायबर कमांडाे तयार करण्याचे ठरवले अाहे. याकरिता सरकारने अायअायटी व अायअायअायटी यांच्याशी समन्वय साधून प्रशिक्षण देण्यात येणार अाहे. यामधील ३५ वेगवेगळया वरिष्ठ पाेलीस अधिकारी, तपास अधीकारी यांना सहा महिन्यांचे निवासी अत्याधुनिक सायबर प्रशिक्षण पुण्यातील डिफेन्स इन्स्टिटयूट अँडव्हान्स टेक्नाॅलाॅजी (डीअायएटी) दिले जाणार असल्याची माहिती डीअायएटीचे कुलपती डाॅ.बीएचवीएस नारायणमूर्ती यांनी पत्रकार परिषदेत दिली अाहे. नारायणमूर्ती म्हणाले, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान प्रकरणात सायबर केसेस मध्ये जलद प्रतिसाद देणे, डिजीटल फाॅरेन्सिक मधील पायाभूत सुविधा सुरक्षित करण्यावर भर देण्यात येईल. सायबर गुन्हे कमी करण्याचे दृष्टीने यामाध्यमातून अागामी काळात प्रयत्न करण्यात येतील. देशात चार हजार ८६० अभियांत्रिकी महाविद्यालय असून त्यामध्ये डीअायटीचा ६३ वा क्रमांक असून पुण्यात पहिल्या स्थानावरी अभियांत्रिकी महाविद्यालय अाहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून कॅम्पस नाेकरी देण्याचे प्रमाण सध्या ७० टक्के असून ते १०० टक्के करण्याचा प्रयत्न अाहे. लष्करी साहित्याचे उत्पादन घेणाऱ्या अनेक कंपन्यांना काैशल्य अाधारित मनुष्यबळ गरज असते त्यानुसार एल अॅण्ड टी मदतीने प्रशिक्षण अभ्यासक्रम घेण्यात येत अाहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने १६ अाठवडयांचा अाॅनलाइन काेर्स सुरु करण्यात अाला असून त्यातून अातापर्यंत तीन हजारजणांना प्रशिक्षण देण्यात अाले अाहे. संशाेधकांसाठी एमटेक अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात येत असून त्यात एक वर्षाचे प्रशिक्षण डीअायटी मध्ये तर एक वर्षाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम डीअारडीअाेत घेतला जाणार अाहे. दीक्षांत समारंभाचे अायाेजन डीअायटी मार्फत सात सप्टेंबर राेजी एमटेक अभ्यासक्रामचे विद्यार्थ्यांचे दीक्षांता समारंभ कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. यंदाच्या वर्षी २२७ विद्यार्थ्यी एमटेकची पदवी प्राप्त करणार असून २३ जणांनी पीएचडी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला अाहे. या कार्यक्रमासाठी संरक्षण विभागाचे सचिव डाॅ.समीर कामत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार अाहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment