दहीहंडीचा उत्साह:गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकाला मिळणार 25 लाखांचे बक्षीस
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मंगळवारी १३५४ हून अधिक दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे वर्तकनगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळेच्या मैदानावर आयोजित दहीहंडी उत्सवात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या गोविंदा पथकासाठी २५ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून लाखो रुपयांची बक्षिसे असलेल्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी टेंभी नाका (ठाणे) येथे दिवंगत आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे आयोजक स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. येथे पुरुषांसाठी एक लाख ५१ हजार पारितोषिक, महिला गोविंदांसाठी एक लाखाचे बक्षीस, ७ थर लावणाऱ्यांना १२ हजार, ६ थरांसाठी ६ हजार, ५ थरांसाठी ६ हजार, ४ थर लावणाऱ्यांसाठी पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात १ हजार ३५४ दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २६१ सार्वजनिक आणि १०९८ खासगी ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विष्णुनगर येथील भगवती मैदानावर, माजी आमदार रवींद्र फाटक यांनी ठाण्यात, बाळकुम जकात नाक्याजवळ ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते देवराम भोईर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भाजप नेते दरेकरांचीही दहीहंडी
शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी देवीपारा मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथे हिंदीच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार यात सहभागी होतात. यंदा ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना १ लाख रुपये, ८ थर लावणाऱ्यांना २५ हजार रुपये, ७ थर लावणाऱ्या ८ हजार रुपये आणि ६ थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ७ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. बोरिवली (पू.) येथील कोरा सेंटर मैदानावर भाजप आमदार सुनील राणे आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी दहिसर (पूर्व), अशोकवन येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. कांदिवली (पश्चिम) येथील पोयसर जिमखाना मैदानावर माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यापूर्वी जय जवान गोविंदा पथकाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड!
जय जवान गोविंदा पथकाच्या गोविंदांनी ऑगस्ट २०२२ मध्ये सर्वात उंच मानवी पिरॅमिडचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आणि मुंबईत ५० फूट उंचीवर दहीहंडी फोडली होती. ऑगस्ट २०१२ मध्ये जय जवान गोविंदा पथकाने ठाण्यात १३.३४ मीटरचा मानवी पिरॅमिड तयार केला. त्यात नऊ थरांचा समावेश होता. स्पेन आणि चीनच्या संघांनी अनुक्रमे ऑक्टोबर २०१२ आणि जुलै २०१५ मध्ये भारताच्या गुणांची बरोबरी केली. दरम्यान, यंदाच्या वर्षी गिनीत बुकमध्ये कुठले गोविंदा पथक रेकॉर्ड करते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
थराला या…नाही तर धरायला या…
मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी वरळी येथील जांबोरी मैदानावर दहीहंडीचे आयोजन केले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत या मैदानावर माजी आमदार सचिन अहिर यांच्या माध्यमातून आयोजन केले जात होते. येथील दहीहंडी ‘परिवर्तन दहीहंडी उत्सव’ या नावाने प्रसिद्ध आहे. या वेळी येथे गोविंदा पथके मानवी मनोऱ्यांच्या माध्यमातून अफझल खान वधाचा विशेष देखावा करतील. ‘थराला या… नाही तर धरायला या…, आपली संस्कृती जपण्यासाठी परिवर्तन दहीहंडीला या…’अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे. एकूणच ठाणे आणि मुंबईमध्ये दहीहंडाचा उत्साह गोंविदा पथकांसह राजकीय पक्षांतही दिसत आहे.