Bigg Boss House: टेलिव्हिजनवरील सर्वात पॉप्युलर रिअॅलिटी शो बिग बॉसचा १६वा सीजन लवकरच सुरू होणार आहे. प्रत्येक सीजनप्रमाणे हा सीजनही बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान होस्ट करणार आहे. चाहत्यांमध्ये या शोबाबत मोठी उत्सुकता आहे. बिग बॉस घरात येणाऱ्या स्पर्धकांसह अनेक प्रेक्षकांना बिग बॉस घर नेमकं कसं असतं, कुठे असतं, ते कोण डिझाइन करतं, त्यासाठी किती खर्च येतो असे अशा अनेक बाबींचं कुतूहल असतं. आतापर्यंत बिग बॉस हिंदीचे १५ सीजन झाले. या प्रत्येक सीजनला बिग बॉसच्या घराची जागा वेगवेगळ्या ठिकाणी होती. तसंच घराची थीमही प्रत्येक सीजनला वेगवेगळी डिझाइन केली जाते. बिग बॉसचा १६वा सीजन १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या घरात नेमकं कोण-कोण येणार याची संपूर्ण यादी अद्याप समोर आलेली नाही.

कुठे होतं बिग बॉसचं घर?

बिग बॉसच्या पहिल्या ते चौथ्या सीजनपर्यंत त्यानंतर सहाव्या ते १२व्या सीजनपर्यंत बिग बॉसचं घर लोणावळामध्ये होतं. म्हणजे जवळपास ११ सीजन लोणावळ्यात बीबी हाऊस (Bigg Boss House) होतं. पाचव्या सीजनसाठी मुंबईजवळच्या कर्जतमध्ये बिग बॉसचं घर तयार करण्यात आलं होतं. त्यानंतर १३व्या आणि १५व्या सीजनसाठीचं घर मुंबईतील गोरेगावमध्ये तयार करण्यात आलं, तर बिग बॉस १४ चं घर मुंबईतल्या फिल्मसिटीमध्ये तयार करण्यात आलं होतं.

किती आहे बिग बॉसच्या घराच्या किंमत?

बिग बॉसचं घर पूर्णपणे फर्निश्ड, सजवलेलं तसंच सर्व आधुनिक सोयी-सुविधांसह तयार केलं जातं. हे घर जवळपास १८,५०० स्क्वेअर फूट इतक्या मोठ्या परिसरात तयार केलं जातं. या घरात एक किचन, एक लिव्हिंग एरिया, १-२ बेडरुम आणि ४ टॉयलेट आणि बाथरुम असतात. या घरात एक स्टोअर रुम, गार्डन, स्वीमिंग पूल, अॅक्टिव्हिटी एरिया, एक जीम, एक कन्फेशन रुम जिथे स्पर्धक बिग बॉसशी सिक्रेटली बोलू शकतात. या घराची किंमत कोट्यवधींच्या घरात असते. बिग बॉस शोच्या मेकर्सने या घराच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही.

कोण आहे बिग बॉस घराचे मालक?

भारतात वेगवेगळ्या भाषांमध्ये चालणारा रिअॅलिटी शो बिग बॉस प्रत्यक्षात नेदरलँड्सचा रिअॅलिटी शो बिग ब्रदरची फ्रेंचाइजी आहे. याला भारतात एंडेमॉल शाइन इंडियाने प्रोड्यूस केलं आहे. ही कंपनी बिग बॉसचं घर भाडेपट्टीवर घेते आणि तीच या घराची मालक आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसचं घर तयार करण्यासाठी जवळपास ५०० ते ६०० मजूरांची गरज लागते. त्याशिवाय हे घर डिझाइन करण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधी लागतो. हेही वाचा –Bigg Boss 16: ५०० लोक, ६ महिने, १०० कॅमेरे; बिग बॉसचं घर कोण डिझाइन करतं?

कोण डिझाइन करतं बिग बॉसचं घर?

बिग बॉसचं घर बॉलिवूडमध्ये सरबजीत, मेरी कॉम, भूमी आणि पीएम नरेंद्र मोदी सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेले दिग्दर्शक उमंग कुमार आणि त्यांची पत्नी विनीता हे घर डिझाइन करतात. विनीता इंटिरिअर डिझायनर आहेत. तर उमंग कुमार यांनी बॉलिवूडमधील अनेक सिनेमांसाठी आर्ट डिझायनर म्हणून काम केलं आहे. बिग बॉसच्या सर्व सीजनमधील बिग बॉस हाऊसचं सुंदर डिझाइन दिग्दर्शक उमंग कुमार आणि त्यांच्या पत्नी विनीता यांच्याकडून केलं जातं. हेही वाचा – Bigg Boss 16 साठी सलमान घेणार नाही १००० कोटी, या सीजनला किती घेणार फी?

घरात राहण्यासाठी किती येतो खर्च? किती स्टाफ असतो?

१२ ते १५ स्पर्धकांसाठी दररोज जेवण, शॅम्पू-साबणापासून ते विजेच्या बिलापर्यंत एका दिवसाचा बिग बॉसच्या घराचा खर्च १५ ते २० हजार रुपये असतो. एका सीजनसाठी बिग बॉसच्या घरावर १५ ते २० कोटी रुपयांचा मोठा खर्च होतो. बिग बॉसच्या ८ तासांच्या शिफ्टसाठी २५० ते ३०० क्रू मेंबर काम करतात. त्यानुसार संपूर्ण दिवस २४ तासांसाठी १००० ते १२०० क्रू मेंबर काम करत असतात. प्रत्येक क्रू मेंबरला आपली शिफ्ट सोडण्याआधी दुसऱ्या शिफ्टमध्ये येणाऱ्या मेंबरला घरातील सर्व गोष्टींची माहिती देऊन जाणं गरजेचं असतं. त्याशिवाय घराच्या सिक्योरिटीसाठी २४ तास घराच्या चारही बाजूंना ५० ते ६० सुरक्षारक्षक तैनात असतात.

टेक्निकल स्टाफ

Bigg Boss House सह इतरही अनेक स्टाफ यासाठी काम करत असतो. १७० कॅमेरांमध्ये रेकॉर्ड होणारा कंटेंट अनेक एडिटर्स ८-८ तासांच्या शिफ्टमध्ये २४ तास काम करत असतात. यात २ स्विच ऑपरेटर्स, रिमोट ऑपरेटर्स, ट्रान्सक्रायबर्स, अॅनिमेशन स्पेशलिस्ट, स्टोरी ए़डिटर्सशिवाय अनेक जणांचा स्टाफ असतो. एकदा संपूर्ण स्टोरी तयार झाल्यानंतर ती एडिट केली जाते. त्यानंतर ही स्टोरी एंडमॉलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि चॅनेल क्रिएटिव्ह हेड अप्रूव्ह करतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.