नवी दिल्लीः BSNL म्हणजेच Bharat Sanchar Nigam Limited देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी आज ४जी आणि ५जीच्या स्पर्धेत खासगी कंपन्यांच्या तुलनेत मागे आहे. परंतु, स्वस्तातील रिचार्ज प्लान्समध्ये बीएसएनएल कंपनीचे नाव सर्वात आधी येते. खासगी कंपनीच्या तुलनेत बीएसएनएलकडे आज सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान्स आहेत. खासगी ऑपरेटर ३जीबी डेली डेटा देतात. तर ५ जीबी डेटा रोज देवून बीएसएनएल कंपनीने आपण या कंपन्यांच्या पुढे आहोत, हे दाखवून दिले आहे. 5G Data Daily देण्यासोबत बीएसएनएलने रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला तगडा झटका बसला आहे. बीएसएनएल केवळ जास्त डेटा देत नाही तर यात ८४ दिवसाची वैधता सुद्धा देते. या बीएसएनएलच्या प्लानची किंमत फक्त ५९९ रुपये आहे. जाणून घ्या डिटेल्स.

बीएसएनएलच्या या प्लानमध्ये काय काय मिळते
दररोज ५ जीबी डेटा, ८४ दिवसाची वैधता, फ्री डेटा, अनलिमिटेड कॉलिंग या प्लानमध्ये मिळते. बीएसएनएलच्या या प्लानची किंमत ५९९ रुपये आहे. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात मिळणारा इंटरनेट डेटा आहे. कंपनी आपल्या या रिचार्ज प्लानमध्ये डेली ५जी डेटा देते. जो ४जीच्या स्पीडवर काम करतो. ५जीबी डेटा संपल्यानंतर यूजर्सला २५ पैसे प्रति एमबीच्या हिशोबानुसार, शुल्क द्यावे लागते.

वाचाः तुमचं आयुष्य आनंदी बनवण्यात रतन टाटा यांचा मोठा हात?, कसा तो जाणून घ्या

प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता
५९९ रुपयाच्या बीएसएनएलच्या प्रीपेड प्लानची वैधता ८४ दिवसाची आहे. या प्लानमध्ये यूजर्संनना मोठी वैधता मिळते. रोज ५ जीबी डेटा या हिशोबानुसार, बीएसएनएल ग्राहकाला एकूण ४२० जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लानमध्ये ग्राहकांना एक्स्ट्रा फ्री डेटा सुद्धा मिळतो. या प्लानमध्ये रात्री १२ ते सकाळी ५ वाजेपर्यंत फ्री इंटरनेट मिळते. बीएसएनएलच्या प्लानमध्ये मोटी वैधता मिळते. तसेच डेटा सोबत कॉलिंग बेनिफिट दिले जाते. या प्लानमध्ये कंपनीकडून अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. यूजर्संना रोज १०० एसएमएस मिळते.

वाचाः Flipkart Sale मध्ये ऑफर्सचा पाऊस ! ९०९९ रुपयांत मिळतोय ‘हा’ किलर स्मार्टफोन, फोनची किंमत ३४,९९९ रुपये

वाचाः Apple कंपनीने चीनपेक्षा टाटावर दाखवला विश्वास, भारतात बनणार ‘मेड इन इंडिया आयफोन’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.