नंदुरबार: घरात आनंदाचे वातावरण होते, तीन दिवसांनी घरात सनईचा सुर वाजणार होता. नवरदेवासह कुटुंबाचा उत्साह गगनात मावत नव्हता. लग्नाचा बस्ता, मंडप, वाजंत्री, जेवणाची संपुर्ण तयारी पूर्ण झाली होती. घरात लगबग सुरू होती. लग्न सोहळ्याची सर्वांना आतुरता लागली होती. मात्र, दुर्दैवाने लग्न घरीच दुर्घटना घडली. तळोद्यातील युवकाचा लग्नाच्या तीन दिवसांआधी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बाथरूममध्ये विजेचा शॉक लागल्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्याच्या तळोदा तालुक्यातील बोरद येथून किसनच्या लग्नाची वरात निघणार होती. मात्र, नियतीला ते मान्य नाही झालं. नियतीने घात केला. दुर्दैवाने किसनच्या लग्नाचं वऱ्हाड निघण्याऐवजी त्याच्या घरुन त्याची अंत्ययात्रा निघाल्याने संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आईचा एकुलता एक आधार आणि तीन बहिणींचा भाऊ हरपला आहे. किसनच्या वडिलांचे पाच वर्षांआधी निधन झाले. त्यानंतर घरात म्हाताऱ्या आईचा कर्ता भक्कम आधार किसनच होता. किसनला तीन बहिणी आहेत.

लग्नाला ५ दिवस असताना बेपत्ता झाली, मग पाण्याच्या पाइपमध्ये अर्धवट मृतदेह; पोलिसांसमोर विचित्र ‘Death Mystery’
बोरद येथील२२ वर्षीय किसन राजाराम शिरसाठ हा गुजरात राज्यात कामाला होता. २८ मे रोजी त्याचा विवाह नियोजित होता. त्याच्या घरात लग्न कार्य असल्याने पाहुणे येण्यास सुरुवात झाली होती. सजावट रंगरंगोटी लग्नघरात तयारी सुरू झाली होती. लग्नपत्रिका वाटप झाल्या होत्या लग्नघरात चोहीकडे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक पुढाऱ्यांना घाम फोडणाऱ्या नेत्याची पुण्यात गोळ्या घालून हत्या

किसन हा भावी आयुष्याची सुरवात करणार होता. नववधूच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली होती. मात्र, किसनचा दुर्दैवी मृत्यू झाला दिनांक २५ मे रोजी बाथरूममध्ये विद्युत बोर्डमध्ये बिघाड झाल्याने किसन ते दुरुस्ती करत असताना किसनला अचानक विजेचा धक्का लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तीन दिवसांनी लग्नाची वरात निघणार होती. मात्र, निघाली अंतयात्रा या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *