मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या दसरा मेळाव्याच्या (Dasra Melava) लढाईत ठाकरेंची सरशी झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर केलेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास ठाकरेंना हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना “प्रत्येक वेळी आपण वाईटाचा विचार करु नये, आपण असं म्हणतो ना शुभ बोल रे नाऱ्या, म्हणजे ती म्हण आहे म्हणून मी बोलतोय” असं म्हणत टोमणा लगावला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उत्साहात या, वाजत गाजत गुलाल उधळत, या मात्र शिस्तीने या, तेजस्वी वारशाला, आपल्या परंपरेला गालबोट लागेल असं वागू नका, आपण शिवरायांच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, इतर काय करतील माहिती नाही, पण दसरा मेळाव्याकडे राज्याबरोबर देशाचं आणि जगभरात राहणाऱ्या मराठी बांधवांचं लक्ष लागलं आहे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं.

शिवसेनेत दोन गट पडलेले नाहीत, शिवसेना तशीच आहे, उलट ती वाढली आहे, परवा मुंबईतील गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कोर्टाने राज्य सरकारवर दिली आहे. राज्य सरकार ती पार पडेल अशी अपेक्षा आहे, असंही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानं शिवसैनिक भावूक; पेढे भरवून आनंद साजरा केला

‘कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला गेला’ असा प्रश्न पत्रकार विचार असतानाच “प्रत्येक वेळी आपण वाईटाचा विचार करु नये, आपण असं म्हणतो ना शुभ बोल रे नाऱ्या, म्हणजे ती म्हण आहे म्हणून मी बोलतोय” असं उद्धव म्हणाले. ही चांगली सुरुवात झाली आहे. विजयादशमीचा पहिला मेळावाही मला आठवतोय, माझे आजोबा भाषण करायला होते, ती परंपरा आम्ही पुढे नेतोय, करोना काळ गेला तर मेळावा आम्ही चुकवला नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

न्यायदेवतेवरचा विश्वास सार्थ ठरला, लोकशाहीचा विजय झाला, सुप्रीम कोर्टातील निकाल हा फक्त शिवसेनाच नाही तर लोकशाहीचं भवितव्य ठरवणारा आहे, अशी टिप्पणीही उद्धव ठाकरेंनी केली.

हेही वाचा :वाजत गाजत या पण शिस्तीत दसरा मेळाव्याला या – उद्धव ठाकरेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.