वाचा: ७००० mAh च्या मजबूत बॅटरीसह लवकरच येतोय पॉवरफुल स्मार्टफोन Tecno Pova 3, सपोर्ट पेज लाईव्ह
जिओचा १७९ रुपयांचा प्रीपेड प्लान:
रिलायन्स जिओ १७९ रुपयांच्या प्रीपेड प्लानसह २४ दिवसांसाठी १ GB दैनिक डेटा ऑफर करते. याशिवाय, जिओ अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि १०० एसएमएस / दिवसाचे फायदे देते. युजर्सना JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. एकदा FUP (वाजवी-वापर-पॉलिसी) डेटा संपला की,स्पीड ६४ Kbps पर्यंत खाली येतो. परंतु, कंपनीने ऑफर केलेला हा सर्वात परवडणारा १ GB दैनिक डेटा प्लान नाही. आणखी एक प्रीपेड प्लॅन आहे. जो, १७९ च्या प्लानप्रमाणेच फायदे देतो. पण, फक्त २० दिवसांसाठी. या प्लानची किंमत १४९ रुपये आहे.
जिओचा १४९ रुपयांचा प्रीपेड प्लान:
रिलायन्स जिओ १४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये २० दिवसांसाठी १०० SMS / दिवस, अनलिमिटड व्हॉइस कॉलिंग आणि १ GB दैनिक डेटा ऑफर करते. यातही युजर्सना तेच सबस्क्रिप्शन मिळते जे १७९ रुपयांच्या प्लानमध्ये दिले जाते. हा प्लान अशा लोकांसाठी आहे जे मोबाईल रिचार्जवर जास्त खर्च करू शकत नाहीत. तुम्हाला हाच प्लान थोडा अधिक वैधतेसह हवा असेल तर, तुम्ही २०९ च्या प्लानचा विचार करू शकता. या खरोखरच भारतातील परवडणाऱ्या प्रीपेड योजना आहेत, 4G नेटवर्कसह समर्थित आहेत.