: ठाण्यातील सुप्रसिद्ध मासुंदा तलावात आज सकाळच्या सुमारास एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलचे जवान यांनी घटनास्थळी पोहचून या महिलेचा मृतदेह बाहेर काढला आहे.ठाण्यातील हा नेहमीच गजबजलेला असतो. त्यातच संध्याकाळनंतर या चौपाटीवर फेरफटका मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शेजारी मोठी बाजारपेठ आणि भाजी मार्केट असल्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु असते. एवढी गर्दी असताना ही महिला पाण्यात पडली कशी याची माहिती अद्याप उघड झालेली नाही. या वृद्ध महिलेची आत्महत्या की घातपात याबाबत देखील अद्याप उलघडा झालेला नाही. त्या प्रकरणी नौपाडा पोलीस तपास करत आहेत. सदर वयोवृद्ध महिला ही अंदाजे ६५ ते ७० वयोगटातील आहे. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही या महिलेची ओळख पटवण्याचे काम नौपाडा पोलीस करत आहेत.१२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली या मिळालेल्या माहितीनुसार बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचा मृतदेह बाहेर काढून नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *