नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशकातील सातपूर एमआयडीसीमध्ये फ्लॅटच्या बाल्कनीतून तोल जाऊन पडल्याने एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. मंगला दत्तात्रय दळवी (वय ७२) असं मृत महिलेचं नाव आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वृद्ध महिलेच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील सातपूर एमआयडीसी भागात एबीबी कंपनीच्या पाठीमागे सोमेश्वर कॉलनीत मंगला दळवी यांच्या भावाचा फ्लॅट असून त्या या फ्लॅटमध्ये आशा फडणवीस यांच्यासोबत राहत होत्या. मंगळवारी सायंकाळी गॅलरीत उभ्या असतांना त्यांचा अचानक तोल गेला आणि त्या खाली पडल्या.

हेही वाचा-फक्त १०-१२ बॉल्स खेळविण्यासाठी या खेळाडूला संघात घेऊ नका, गौतम गंभीर स्पष्टच बोलला

उंचावरुन खाली पडल्याने मंगला दळवी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन पुढील कारवाईसाठी रवाना केला. दरम्यान, या थरारक घटनेचा व्हिडीओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

हेही वाचा –आयकर आयुक्त बनून उत्पादन शुल्क अधिकाऱ्याकडे गेला, मागणी ऐकून अधिकारीही चक्रावला…

उंच इमारतीतील बाल्कनीला सुरक्षा जाळी नसल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे उंच इमारतीतील फ्लॅटमध्ये राहत असलेल्या नागरिकांनी शक्य झाल्यास गॅलरीला ग्रिल बसवून घ्यावे. तसेच, पालकांनी आपली लहान मुले बाल्कनीत खेळत असल्यास अथवा वयो वृध्द लोक बाल्कनीत असल्यास त्यांच्यावर लक्ष द्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जेणेकरुन अशी घटना पुन्हा घडणार नाही. तसेच, बांधकाम व्यावसायिकांनी इमारत उभारताना सुरक्षित गॅलरी कराव्यात, असे आवाहन देखील वरिष्ठ पोलीस निरिक्षक चव्हाण यांनी केले.

हेही वाचा –हॉस्टेलमधील मुलींच्या बाथरुमध्ये डोकावून पाहणाऱ्याला अटक, IIT Bombay मधील धक्कादायक प्रकार

बिबट्याला पाहून नदीच्या पुरात उडी, तब्बल १३ तास पाण्यात; लताबाईंच्या शौर्याची कहाणीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.