काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा पराभव:बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरेंसह यशोमती ठाकुर यांना मतदारांचा धक्का
बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल, तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वत:चाच मतदार संघ वाचवू शकले नाहीत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. सत्ता स्थापनेचा दावा करणारे काँग्रेसवर आता अनेक मतदारसंघातील महत्त्वाचे नेते गमावण्याची नामुष्की ओढावली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस मधून मुख्यमंत्री पदाचा दावा ठोकणाऱ्या प्रमुख नेत्यांचा देखील पराभव झाला आहे. त्यातही ज्या नेत्यांचा विजय झाला, तो देखील अवघ्या काही मतांनी निसटचा विजय मिळाला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काँग्रेसचा राज्यात सुपडा साफ झाला असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सर्वात मोठे दावेदार थोरात पराभूत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भाऊसाहेब थोरात हे पराभूत झाले आहेत. थोरात हे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदान मानले जात होते. तसेच सध्या राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, स्वत:चा मतदार संघ राखण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. माझा मुलगा मुख्यमंत्री होणार:देवेंद्र फडणवीसांना आई सरिता यांच्या खास शुभेच्छा; म्हणाल्या, ‘त्याने मुख्यमंत्री व्हावे, ही जनतेची इच्छा’ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील भाजप आणि महायुतीच्या विजयाचे शिल्पकार मानले जात आहेत. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांना त्यांची आई सरिता फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या. माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावे, ही राज्यातील जनतेची इच्छा असल्याचेही सरिता फडणवीस यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा….