दिल्लीची निवडणूक हा केवळ बहाणा:तिथे कुणीही जिंकले, तरी शहा-मोदी सरकार चालवतील; संजय राऊतांची टीका

दिल्लीची निवडणूक हा केवळ बहाणा:तिथे कुणीही जिंकले, तरी शहा-मोदी सरकार चालवतील; संजय राऊतांची टीका

काँग्रेस देशात मोठा पक्ष आहे, परंतु दिल्लीत आप मोठा पक्ष आहे. दिल्लीत आम आदमी पार्टीची ताकद सर्वाधिक आहे. काँग्रेस आणि आप इंडिया आघाडीचा भाग आहेत. केजरीवाल सारख्या नेत्यावर खोटे आरोप करून प्रचार करणे, याच्याशी आम्ही सहमत नाही. लोकसभा निवणुकीत आम्ही एकत्र लढलो, पण दिल्ली विधानसभेची स्थिती वेगळी आहे. तेथे कुणीशी जिंकले, तरी अमित शहा किंवा नरेंद्र मोदी सरकार चालवतील. निवडणूक हा बहाणा आहे. हे लोक कुणालाही काम करू देणार नाहीत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. इंडिया आघाडीला प्रत्येक निवडणुकीशी जोडू नका
दिल्लीत भाजप किंवा काँग्रेस जिंकताना तिथे दिसत नाही. काँग्रेस आणि आप एकत्र लढले असते, तर आनंद झाला असता. काँग्रेस आणि आपने प्रचारात बॅलेन्स ठेवला पाहिजे. दिल्ली विधानसभा, मुंबई महानगरपालिका यांसारख्या निवडणुका कार्यकर्त्यांवर सोडायला पाहिजे. इंडिया आघाची ही लोकसभासाठी बनवली होती. त्यामुळे इंडिया आघाडीला प्रत्येक निवडणुकीशी जोडू नका, असे संजय राऊत म्हणाले. आपचे नेते शिवसेनेच्या जास्त संपर्कात
सध्या काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहे. महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीत आणि केंद्रात इंडिया आघाडीत आहे. केजरीवाल आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांचा शिवसेनेशी संवाद जास्त आहे. ते आमच्या संपर्कात जास्त असतात, असा दावा संजय राऊत यांनी केला. दिल्लीप्रमाणे मुंबई पालिका निवडणुकीत होऊ शकते
आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते, तर चांगला निकाल मिळू शकेल, अशी स्थिती आहे. पण दुर्दैवाने महानगरपालिका, नगरपंचायत किंवा दिल्ली सारख्या लहान विधानसभा निवडणुकांत कार्यकर्त्यांच्या दबावामुळे या गोष्टी शक्य होत नाही, असेही राऊत म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आपच्या बाबतीत जसे घडले, तसे उद्या कदाचित मुंबई महानगरपालिका निवडणुकीतही होऊ शकते, अशी शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली. कारण विधानसभेच्या खालच्या लहान निवडणुका कार्यकर्त्यांचे मनोबल राखण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त जागा लढणे आवश्यक असते, असेही राऊत म्हणाले. भाजप विरोधात सर्व विरोधीपक्षांची एकजूट आवश्यक
इंडिया आघाडी इतिहास जमा झाल्याचे तेजस्वी यादव म्हणाले होते, यावरही संजय राऊत यांची प्रतिक्रिया दिली. इंडिया आघाडी आज कायम आहे. लोकसभा आणि राज्यसभेत आम्ही इंडिया आघाडी म्हणूनच काम करत असतो. बिहारमध्ये निवडणुका आल्यानंतर तेजस्वी यादव यांना काँग्रेससोबत हातमिळावी करावीच लागेल. कारण लालू प्रसाद यादव भाजपसोबत युती करणार नाहीत. भाजप आणि एनडीएविरोधात उभे राहण्यासाठी सर्व विरोधीपक्षांची एकजूट आवश्यक आहे. अन्यथा नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचा भस्मासूर पक्ष सर्वांना खाऊन टाकेल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
मंत्र्यांना मराठीविषयी धडे देण्याची गरज
संजय राऊत यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या जीआरवरून राज्य सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील मंत्र्यांना मराठी भाषा, संस्कृती, संस्कार, अस्मिता याविषयी धडे देण्याची गरज आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेसंदर्भातील घोषणा केली, पण आदेश निघाल्याशिवाय ते घोषणा करू शकत नाही. राज्य सरकारने तत्काळ केंद्राशी संवाद साधून यासंदर्भातील आदेश घ्यायला पाहिजे होता. पण राज्यातील संबंधित मंत्र्यांना मराठी भाषेच्या संवर्धनापेक्षा इतर काही महत्त्वाची कामे हातात असतील, त्यामुळे हा घोळ झाला असावा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment