पुणे : सॅनिटरी नॅपकिन घेऊन घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयने २६ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यातील वाकडेवाडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत घडला आहे. मोबाईल फोनला चार्जिंग करण्याच्या निमित्ताने संबंधित डिलिव्हरी बॉय घरात घुसला. संधी मिळताच त्याने तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.

तरुणीने नकार दिल्यावर अखेर डिलिव्हरी बॉय तिथून निघून गेला. या प्रकरणी संबंधित तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार स्विगीच्या डिलिव्हरी बॉय विरोधात खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात साप चावला, उपचारांसाठी दोन हॉस्पिटल फिरण्याची वेळ, हातातोंडाशी आलेली लेक गेली
या प्रकरणी अधिक माहिती अशी की फिर्यादी तरुणीने स्विगीवरुन घरगुती सामान मागवले होते. ते सामान आल्यानंतर चेक करत असताना त्यात सॅनिटरी पॅडचे पॅकेट फोडल्याचे आढळून आले. तिने स्विगीला मोबाईलवरुन फाटलेल्या सॅनिटरी पॅडचा फोटो पाठवला. त्यानंतर नवीन सॅनिटरी नॅपकिन घेऊन डिलिव्हरी बॉय आला होता. यावर संबंधित डिलिव्हरी बॉयने पैशांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी तरुणीने स्विगीशी बोलून घ्या असे त्याला सांगितले.

वडिलांनी नवं घर बांधलं, लेकाने किचनमध्येच आयुष्य संपवलं, दृश्य पाहून मायबापाच्या पायाखालची जमीन सरकली
त्यावर संबंधित डिलिव्हरी बॉयने ‘तुम सेक्स करोगी?’ असे म्हणत तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न केल्याचा आरोप आहे. तसेच अश्लील हावभाव करत मोबाईल फोन चार्जिंग करण्याच्या निमित्ताने घरात येऊन त्याने तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी घडवली अद्दल, जिथे वाहनांची तोडफोड तिथेच काढली धिंडSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *