नगरपालिकेतील 15 टक्के कर वाढीस स्थगिती देण्याची मागणी:एरंडोल येथील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्र्यांना साकडे
एरंडोल येथील नगर परिषदेमार्फत सन २०२२-२३ ते २०२५-२६ साठी ची १५ टक्के कर वाढीस स्थगिती मिळावी व पालिका हद्दीतील खरेदी विक्रीवर आकारला जाणारा १ टक्के कर रद्द करण्यात यावा. या मागणीचे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले. उपोषणकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहराध्यक्ष गोरख चौधरी सोबत भाजपचे जनजातीय क्षेत्र प्रमुख अँड. किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमित पाटील, शहर प्रमुख शिंदे गट शिवसेना आनंदा चौधरी,काँग्रेस पक्षाचे विजय महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख ठाकरे गट जगदीश पाटील व एरंडोल शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. एरंडोल व पारोळा या दोन्ही शहरात एकाच वेळेस करवाढ झाली होती. आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन पारोळा येथील कर वाढीस स्थगिती मिळवली. त्या धर्तीवर एरंडोल नगरपालिकेने केलेल्या कर वाढीस स्थगिती मिळावी. अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे अश्वासित केले.