परभणी : तीन मित्रांमध्ये दारू पार्टी सुरु होती. अजून दारू आणण्यासाठी पैसे मागितल्यानंतर पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून एकाने दोघं मित्रांना मारहाण करत नाल्यात ढकलून दिल्याची धक्कदायक घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने बाजूला पडलेला दगड उचलून एका मित्राच्या डोक्यात घातला यामध्ये जखमी झालेल्या मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही अंगावर शहारे आणणारी घटना परभणी तालुक्यातील झरी गावामध्ये घडली आहे. गंगाधर पवार असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान विठ्ठल जगाडे, गंगाधर पवार आणि बालाची गवळी हे तीन मित्र दारू पिण्यासाठी गावाच्या बाहेर गेले होते. गावाच्या बाहेर असलेल्या एका नाल्यावर असलेल्या कठड्यावर बसून तिघांनी दारू पिली. दारू संपल्यामुळे बालाजी गवळी याने दारू पिण्यासाठी भगवान जगाडे आणि गंगाधर पवार यांच्याकडून पैसे मागितले. मात्र, दोघांनी आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितल्यामुळे संतप्त झालेल्या बालाजीने दोघं मित्रांना बेल्टने मारहाण करत कठड्यावरुन नाल्यात ढकलून दिले.

न्यूझीलंड विरुद्धचा सामना हरलो, तरी धवनला मिळाली गुड न्यूज, थेट विराट-धोनीच्या क्लबमध्ये
बालाजी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने बाजूला पडलेला दगड उचलून गंगाधरच्या डोक्यात घातला. त्यात गंगगाधर गंभीर जखमी झाला आणि त्याला उपाचारासाठी परभणी येथील ग्रामीण जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले होते. मुंबई येथे उपचार सुरु असताना गंगाधरचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भगवान विठ्ठल जगाडे याने दिलेल्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, गंगाधर पवार याचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला असल्याने झरी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

विरोधकांना 50 खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा हिशेब तर द्यावाच लागेल | गुलाबराव पाटीलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *