महिला कार्यकर्त्यांची भाजप कार्यालयासमोर निदर्शने:जम्मू-काश्मीर निवडणुकीत महिलांना कमी जागा दिल्याने नाराजी, भेदभावाचा आरोप
जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात सप्टेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिल्या टप्प्याची यादी जाहीर केली, त्यानंतर मंगळवारी (27 ऑगस्ट) महिलांनी भाजप कार्यालयाबाहेर निदर्शने केली. निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्यास भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी केलेल्या आंदोलनानंतर लगेचच पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनीही तिकीट वाटपात महिलांशी भेदभाव केल्याचा आरोप करत पक्ष कार्यालयाबाहेर निदर्शने केली. दोडा आणि राम नगरसह जम्मूच्या विविध भागातील हिला मोठ्या संख्येने येथील भाजप कार्यालयासमोर जमल्या होत्या. काय आहे महिला कायकर्त्यांची मागणी?
एकीकडे पक्ष महिला सक्षमीकरण आणि हिताच्या गोष्टी बोलतो, तर दुसरीकडे पक्षाने तिकीट वाटपात महिला कार्यकर्त्यांशी पूर्णपणे भेदभाव केला असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. त्यांनी म्हटले की 42 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती, ज्यामध्ये फक्त एका महिलेचे नाव आहे आणि तेही दहशतवाद पीडित कुटुंबातील, ज्यांचे वडील आणि काका यांनी देशासाठी बलिदान दिले होते. महिलांना त्यांचे हक्क मिळावे ही आमची एकच मागणी असून पुढील यादीत काही महिलांना उमेदवारी द्यावी, हा आमचा हक्क आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले. आंदोलक महिलांनी सांगितले की, आम्ही पक्षाच्या निर्णयावर नाही, तर आम्ही आमच्या हक्काची मागणी करत आहोत.