बारामती: बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शीतल यांच्यावर पुणे शहरातील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानं अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बालक पोरक झाले आहे.

शीतल या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपाचारासाठी त्यांना केईम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचे निधन झाले.

वाचा- अजब! एका उंदराच्या करामतीने अख्खं शहर झालं हैराण; तब्बल ११ तास बंद होता पाणीपुरवठा

शीतल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या.पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या.पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे. शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी आज सकाळी दहा वाजता पणदरे इथे करण्यात येणार आहे.

वाचा- भारताची रंगीत तालीम आजपासून; वर्ल्डकप ऑस्ट्रेलियामध्ये, टीम इंडियाची तयारी घरातूनSource link

Leave a Reply

Your email address will not be published.