मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाला देशाला भेट म्हणून चित्ते दिले आहेत. भारतात आणि संपूर्ण देशामध्ये चित्त्यांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन ७० वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा चित्ते दिसणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाला आठ चित्ते नांबियामधून भारतात आणले. हे आठही चित्ते मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले आहेत. या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात चित्त्यांबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. हे कुतूहल शमवण्यासाठी ‘इंडियाज वाईल्ड लेपर्ड्स’ हा माहितीपट प्रत्येकानं बघायला हवा.

पत्नीच्या जाण्यातून सावरला नाही अभिनेता, एकट्यानेच सांभाळतोय मुलाला

काय आहे माहितीपटामध्ये

भारत ही वाघांची भूमी म्हणून ओळखली जाते. परंतु ही भूमी गर्द जंगलामध्ये राहणाऱ्या चित्त्यांचीदेखील होती. नॅशनल जिओग्राफिकचे फोटोग्राफर संदेश कादुर यांनी त्यांच्या इंडियाज वाइल्ड लेपर्ड्मध्ये चित्त्यांबद्दल अनेक गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत.

४४ मिनिटांचा आहे माहितीपट

या माहितीपटामधून कादूर यांनी अत्यंत मेहनत घेऊन आपल्या देशातील जंगलातील प्राण्यांच्या विश्वाचं चित्रीकरण केलं आहे. हा माहितीपट केवळ ४४ मिनिटांचा आहे. परंतु यात माहितीचा रंजक खजिना आहे. ही नॅशनल जिओग्राफीकल डॉक्युमेंट्री संपूर्ण कुटुंबाबरोबर एकत्र पाहण्यासारखी आहे.

कोण आहे देव चित्रगुप्त, ज्यांच्या अपमानामुळे ‘थँक गॉड’ होतोय बॉयकॉट

‘इंडियाज वाइल्ड लेपर्ड्स’बद्दल

या माहितीपटामध्ये अनेक रंजक, उत्कंठावर्धक गोष्टी आहेत. ज्या लोकांना वाघ, चित्ते आवडतात त्यांच्यासाठी हा माहितीपट म्हणजे खजिनाा आहे. हा माहितीपट डिन्सी प्लस हॉटस्टारवर बघता येईल. आफ्रिकन कॅट्स असं आधी याचं नाव होतं आता ‘इंडियाज वाईल्ड लेपर्ड्स’ असं त्याचं नाव आहे.

या माहितीपटामध्ये चित्त्यांबद्दल रंजक आणि मजेशीर माहिती दिली आहे. परंतु आपण त्यांच्याबद्दल ऐकलं आहे, अथवा त्यांना प्राणीसंग्रहालयात बघितलं आहे. परंतु आता हे चित्ते आपल्या भारतात आले असून लवकरच ते सगळ्यांना पाहता येतील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.