देशमुख कुटुंबीयांनी भगवागडावर घेतली महंतांची भेट:धनंजय देशमुखांनी मांडला गुन्हेगारांचा कच्चाचिठ्ठा, शास्त्री म्हणाले – गड कुटुंबीयांच्या पाठिशी

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आज भगवानबाबा गडावर महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली. या भेटीत धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्यासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्याची यादी सादर केली. तसेच खूनामागील खरे कारण, आरोपींचा गुन्हेगारीचा इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, अशी सर्व कुंडली नामदेव शास्त्री महाराजांसमोर मांडली. संतोष देशमुख यांचे काय चुकले? असा सवाल करत आरोपींना पाठिशी घालणारे जातीयवाद निर्माण करत असून आम्ही कधीही जातीयवाद निर्माण केला नाही, असे धनंजय देशमुख यावेळी म्हणाले. महंत नामदेव शास्त्री यांनी लगेच भगवागड हा देशमुख कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचे जाहीर केले. आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…