शेअर बाजारात मुहूर्ताचे सौदे
मुहूर्त ट्रेडिंग शेअर बाजारातील एक पारंपारिक प्रतीकात्मक व्यवहार आहे. या दिवशी गुंतवणूकदार शुभ नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही काळ ट्रेंड करतात. या काळात ट्रेडिंग केल्याने पुढील वर्ष यश आणि भरभराटीचे जाईल असा गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. भारतीय शेअर बाजारात ही परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे.
मुहूर्त ट्रेडिंगची वेळ
एनएसईने दिलेल्या माहितीनुसार यावेळी १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७.१५ पर्यंत बाजारात मुहूर्त ट्रेडिंग केले जाईल. ६ ते ६.१५ या वेळेत प्री-ओपनिंग होईल,त्यानंतर सामान्य गुंतवणूकदार संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ पर्यंत ट्रेडिंग करू शकतील. तसेच ब्लॉक डील विंडो फक्त ५.४५ वाजता उघडेल आणि ट्रेडमध्ये कोणाला फेरफार करायचा असेल तर तो संध्याकाळी ७.२५ वाजता करता येईल. मुहूर्त ट्रेडिंगचे शेवटचे सत्र ७.२५ ते ७.३५ पर्यंत असेल. तर कॉल ऑक्शन इलिक्विड सेशन संध्याकाळी ६:२० ते ७:०५ दरम्यान होईल.
मुहूर्त ट्रेडिंगला कसा असेल बाजाराचा मूड
मागील पाच वर्षात शेअर बाजारात तेजीने व्यवहार झाला आणि सेन्सेक्स निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाला. गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये मुहूर्त व्यवहारात सेन्सेक्सने अवघ्या एका तासात ५२४ अंकांच्या वाढ नोंदवली होती. तर २०२१ मध्ये सेन्सेक्स २९६ अंक उडी घेत बंद झाला. अशा परिस्थितीत तज्ज्ञांच्या मते यंदाही दिवाळीच्या मुहूर्तावर सेन्सेक्समध्ये तेजीची शक्यता आहे.