मुंबई : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आला असून धनत्रयोदशी किंवा धन तेरसचा सण दिवाळीची सुरुवात मानला जातो. आज, १० नोव्हेंबर रोजी देशभरात धनत्रयोदशीचा सण साजरी होणार आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे आज अनेक लोक या दिवशी सोने खरेदी करण्याला प्राधान्य देतात. सणाआधीच बाजारात लक्ष्मी-गणेश आणि व्हिक्टोरिया चांदीच्या नाण्यांना मोठी मागणी असते. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच ग्रॅम, १० ग्रॅम, २० ग्रॅम आणि ५० ग्रॅमच्या नाण्यांच्या खरेदीत वाढल्याचे दिसून आले आहे.

चांदीच्या नाण्यांची वाढती मागणी पाहता ज्वेलर्सही अनेक ऑफर्स देत आहेत. देशभरात लक्ष्मी-गणेश आणि दोन, पाच आणि १० ग्रॅमची व्हिक्टोरिया नाणीही विकली जात आहेत. पाच ग्रॅम चांदीचे नाणे ८०० ते १,००० रुपयांना खरेदी करता येते. तर १० ग्रॅम चांदीच्या नाण्याची किंमत १,२०० ते १,८०० रुपये आणि २० ग्रॅम चांदीच्या नाण्याची किंमत २,००० ते ३,००० रुपये आहे.

Gold Hallmark: हॉलमार्किंगही असू शकते बनावट! धनत्रयोदशीला दागिने खरेदी करत असाल तर खरा की खोटा नक्की तपासा
सोन्या आणि चांदीची नाणी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

सोन्या आणि चांदीच्या प्रति भारतीय ग्राहकांचे आकर्षण कोणापासून लपलेले नाही. अनेकदा सणोत्सवात मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानली जाते. अशा स्थितीत दिवाळीच्या आधी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर आज सोन्या किंवा चांदीची नाणी खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे.

दिवाळीत सोन्यातील गुंतवणुकीचे ‘हे’ पाहा, कशावर आकारला जातो किती कर? समजून घ्या, मगच खरेदीला जा
१. फक्त मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडूनच सोने खरेदी करा. खरेदीवेळी किंमत आणि मेकिंग चार्जेस जाणून घ्या.

२. ग्राहकांनी नेहमी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क केलेले सोने खरेदी करावे.

३. सोन्याचे कॅरेट देखील तपासा. कॅरेट सोन्याची शुद्धता दर्शवते. कॅरेट जितके जास्त तितके सोन्याच्या शुद्धतेची टक्केवारी जास्त.

४. खरेदी केल्यानंतर तुम्हाला सोन्याची किंमत आणि मूल्य नमूद केलेल्या बिलाचा आग्रह धरा. बिलामध्ये मेकिंग चार्ज स्वतंत्रपणे दर्शविला आहे की नाही हे तपासा.

५. तुम्ही सोने नंतर विकण्याचा विचार करत असाल, तर त्याच्या एक्सचेंज पॉलिसीबद्दल नक्कीच विचारा.

६. ज्वेलर्स जास्त पैसे घेत असतील तर सोन्याची नाणी घेण्यापूर्वी किंमतही तपासून घ्यावी.

Read Latest Business News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *