धारावीच्या मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात:या आधी मनपाला झाला होता मोठा विरोध
धारावी येथील मेहबूब-ए-सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास ट्रस्टने सुरुवात केली आहे. अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी पालिका गेली असता विरोध झाला होता. या घटनेने धारावीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नुकतेच ट्रस्टने मशिदीतील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत आज ट्रस्टने मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील धारावी येथे असलेली मेहबूब-ए-सुबानिया मशीद 60 वर्षांहून अधिक जुनी आहे. या मशिदीला दोन वर्षांपूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणात कोणताही तोडगा निघाला नाही. जेव्हा ही मशीद बांधली गेली तेव्हा तिला ग्राउंड प्लस 2 मजले होते. पावसाचे पाणी या मशिदीत शिरायचे आणि त्यामुळे मशिदीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. वाढत्या लोकसंख्येमुळे मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी एक मजला वाढवण्यात आला. तीन वर्षांपूर्वीपासून हे काम सुरू होते आणि आताच मशीद पूर्णपणे तयार झाली आहे. धारावी मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीची टीम आल्यावर गोंधळ झाला होता. त्यावेळी हजारोंचा जनसमुदाय जमला होता. धारावी मशिदीबद्दल काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस? याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य समोर आले होते. हा न्यायालयाचा निर्णय आहे, असे ते म्हणाले होते. यापूर्वीही न्यायालयाने बेकायदा बांधकाम हटवण्यास सांगितले होते. त्यावेळीही बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी बीएमसी पोहोचली होती, त्यानंतर ईदनंतर बेकायदा बांधकाम हटवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले होते. यानंतर बीएमसीचे पथक तेथे गेले. बीएमसी आल्यावर मस्जिद कमिटीने सांगितले की त्यांना 4 ते 5 दिवसांचा अवधी हवा आहे, त्या दरम्यान ते स्वतः बेकायदा बांधकाम हटवतील, त्यामुळे बीएमसीची टीम परतली. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मला विश्वास आहे की मस्जिद समितीने बीएमसीला ज्या प्रकारे आश्वासन दिले आहे, त्याच पद्धतीने पुढील कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा खिसा तिसऱ्याच्या पॅन्टला:गणेवशाचे धक्कादायक चित्र; विरोधी पक्षाचा राज्य सरकारवर निशाणा राज्य सरकारच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गणवेशाच्या दर्जावरून आता नव्या वादाला तोंड फुटले आहेत. सरकारी शाळे मधील अनेक गरीब विद्यार्थी शासनाकडून मिळणाऱ्या गणवेशावर अवलंबून असतात. मात्र, या गणवेशाचे दशा पाहून कोणाच्याही मनात संतापाची भावना निर्माण होऊ शकते, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केली आहे. या संबंधात दानवे यांनी एका शाळकरी विद्यार्थ्यांचा गणवेशातील फोटो पोस्ट केला आहे. तसेच यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पूर्ण बातमी वाचा… भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव:परिवर्तनाची चाहूल असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे गटाचा BJP वर जोरदार हल्ला तरुणांचा आवाज म्हणून विद्यापीठांच्या ‘सिनेट’कडे पाहिले जाते. फी, परीक्षा, अभ्यासक्रम यावर तेथे चर्चा घडतात व निर्णय होतात. पदवीधरांचा आवाज हा लाखो तरुणांचा आवाज आहे. तरुणांच्या हाती देशाचे भवितव्य आहे. त्या पदवीधरांच्या सिनेट निवडणुकाच होऊ द्यायच्या नाहीत हे धोरण पराभवाच्या भयातून आले होते. मात्र मुंबई विद्यापीठात पदवीधरांनी भाजपच्या थैलीशाही व मुजोर राजकारणाचा पराभव केला. ही परिवर्तनाची चाहूल असल्याचे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. त्यांनी दैनिक सामानाच्या माध्यमातून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पूर्ण बातमी वाचा…