धुळे: धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चड्डी-बनियान गँग दाखल झाल्याची चर्चा सर्वत्र होत होती. मात्र, या गॅंगला कोणीच पाहिलं नव्हतं. मात्र, काल रात्री ही गॅंग साक्री शहरातील एका किराणा दुकानात शिरली आणि त्यावेळेस दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चड्डी-बनियान गँगची दहशत बघावयला मिळाली.

साक्री शहरातील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या काकाजी प्रोव्हिजन या किराणा दुकानातून रोकडसह काजू, बदाम त्याचबरोबर इतर सामान चोरी करून चड्डी-बनियान गँगच्य चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही सर्व चोरीची घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून यामध्ये चोरट्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत आहेत. घटनेची माहिती उघडकीस येताच साक्री पोलीस ठाण्यात या संदर्भात माहिती देण्यात आली.

हेही वाचा – भीषण! भररस्त्यात तरुणावर ३५ वेळा वार, पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला, पुण्यात हत्येचा थरार

साक्री पोलिसांनी तात्काळ चोरी झालेल्या ठिकाणी पोहोचून डॉगस्कॉड त्याचबरोबर फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांच्या मदतीने चोरट्यांचा तपास सुरू केला आहे. दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेजच्या आधारे ही चोरी चड्डी-बनियन गँग यांनीच केली असावी असा दावा करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यात झालेल्या अनेक चोऱ्यांमध्ये याच गँगचा समावेश आहे की अजून कोणी या चोरीमध्ये सहभागी आहे, याचा तपास आता पोलीस करीत आहे.

हेही वाचा – अशीही लव्ह स्टोरी, प्रेयसीचं दोनदा लग्न मोडलं, पंचायतने थेट निकाल लावला

तरुणाची दुचाकी हरवली, शोधाशोध केल्यावर विहिरीत सापडलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.