धुळे: शिवमहापुराण कथेत लाखोंच्या संख्येने भाविकांच्या गर्दीत संधीचा फायदा घेत हातसफाई करणाऱ्या तीन पाकीटमार चोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या धुळे पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून पाकीटे आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहे. धुळ्यातील सुरत बायपास जवळील रस्त्यालगत ख्यातनाम शिवमहापुराण कथावाचक पंडीत प्रदिप मिश्रा यांचे दिनांक १५ नोव्हेंबरपासून कथावाचन कार्यक्रम सुरु आहे. शिवमहापुराण कथेला भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून लाखोंच्या संखेने भाविक येथे दाखल झाले आहेत.

गर्दीचा फायदा घेऊन भाविकांच्या गळ्यातील सोन्याची माळ आणि पाकीटमारी होण्याची शक्यता असल्याने याबाबत संजय बारकुंड, पोलिस अधीक्षक धुळे आणि किशोर काळे, अपर पोलिस अधीक्षक धुळे यांनी दत्तात्रय शिंदे पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते. त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साध्या वेशात गर्दीत राहुन संशयितांचा शोध घेत असतांना धुळे, मालेगाव व भुसावळ येथील तीन पाकीटमार मिळून आले. धुळे पोलिसांच्या पथकाने पाकीटमार चोरट्यांकडुन चोरी केलेली पाकीटे हस्तगत केले असून त्यांचे ईतर साथीदारांकडून इतर पाकीटे आणि मोबाईल हस्तगत करण्यात आहेत.

कथा ऐकण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे, चांदीचे दागिने चोरी करणाऱ्या संशयित महिलांना विचारपुस करण्यात येत आहे. शिवमहापुराण कथेसाठी येणाऱ्या भाविकांनी त्यांच्या किंमती वस्तू चोरी होणार नाहीत, याची काळजी घेणेबाबत धुळे पोलिस प्रशासणातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

जुन्या भांडणाचा राग, मित्रावर वार; डोक्यात दगड घालून संपवलं, नाशकात हत्येची हादरवणारी घटना
Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *