लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाला:मूकबधीर महिलेने हातवारे करून दिली अजित पवार यांना माहिती, पाहा VIDEO
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याच्या विविध भागात जाऊन लाडक्या बहीणींची भेट घेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती व त्यासंबंधी जनजागृती करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील अजित पवारांच्या या दौऱ्याला महत्त्व मिळत आहे. त्यांच्या या दौऱ्यावेळी अहेरी येथे अजित पवारांना एका मूक महिलेनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एका मुक महिलेने अजित पवारांना हातवारे करून सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच या योजनेमुळे मिळालेल्या पंधराशे रुपायांमुळे त्यांनी समाधान व्यक्त केला आहे. यावेळी अजित पवारांनी देखील त्यांना व्यवस्थित प्रतिसाद देत संवाद साधला. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. एकीकडे अजित पवार लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने रराज्यभर फिरत आहेत. मात्र यात देखील श्रेयवाद निर्माण झाल्याचेही पुढे आले आहे. बारामती शहर परिसरात लावलेल्या फ्लेक्सवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो न लावता फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मोरगाव रस्त्यावर लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो होते, मात्र यात देखील उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो नव्हता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, महायुतीने आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार करायला सुरू केला आहे. यातून महिलांचे मत महायुतीच्या बाजूने वळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसते. याच लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीने महायुतीवर टीका केल्याचेही समजते. महायुती सरकारला निवडणूक तोंडावर आल्यावर लाडक्या बहिणी आठवल्या, अशी टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.