दोन दिवसांत मार्ग काढा, हात जोडून सांगतो:मनोज जरांगेंची सरकारकडे मागणी, समाजबांधवांना आत्महत्या न करण्याची विनंती

मराठा आरक्षणसाठी राज्यात 3 तरुणांनी आत्महत्या केली होती. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना आत्महत्या न करण्याची विनंती केली. न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. मला राज्यात कुणाची नाही, पण तुमची फार गरज आहे. मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही आत्महत्या करू नका, असे मनोज जरांगे म्हणाले. एका टक्क्यावरून हुकले, तर हुकू द्या. धाडसी बना. एक दोन वर्ष रिपीट करा, पण आपल्या आई-बापापासून लांब जाऊ नका. आपल्या आई-बापाला दुसरा कोणाचा आधार नाही, असेही ते म्हणाले. मनोज जरांगे यांनी सरकारकडेही दोन दिवसांत मार्ग काढण्याची मागणी केली. मराठा आरक्षणावर दोन दिवसांवर मार्ग काढा, तुम्हाला हात जोडतो. अन्यथा आम्हाला आंदोलन अधिक तीव्र करावे लागले, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड, बदनापूर आणि सिल्लोड येथे मराठा समाजबांधवांनी आत्महत्या केली होती. यावरून मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना आत्महत्या न करण्याची विनंती केली. उशीर होऊ द्या, पण तुम्ही संपू नका मनोज जरांगे म्हणाले, यावेळेस आरक्षण हुकले, हा तुमचा दोष नाही. तुमचे आई-वडील तुम्हाला कष्ट करून पैसे पुरवतात. नोकरी लागण्याचे तुम्ही स्वप्न बघितलेले असते. दुसरा कमी गुण असून नोकरीला लागला. पण तुम्हाला मार्क असून तुम्ही लागला नाहीत. तुमची भावना योग्य आहे. पण नाईलाज आहे. एक-दोन वर्ष उशिर होऊ द्या. काही फरक पडत नाहीत. तुम्ही कायमचे संपू नका. संयम सुटला तर वेगळे आंदोलन करावे लागले मनोज जरांगे यांनी पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. तुम्हाला अजून किती बळी पाहिजेत? असा सवाल जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. वेगळ्या कारणासाठी दोन-चार जणांनी आत्महत्या केली, तर तुम्ही पुनवर्सन करतात. मराठा समाजाचे तरुण राजकारण नाही, तर भविष्य मागत आहेत. भविष्यासाठी हक्काचे आरक्षण मागत आहेत, तुम्ही ते देत नाहीत. तुम्ही माणुसकी शून्य झालात. तुम्ही मराठ्यांचे मुडदे पडू देऊ नका, असे ते म्हणाले. संयम सुटला तर मला महाराष्ट्रात वेगळे आंदोलन करावे लागले, असा इशाराही मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. जातीच्या लेकरांपेक्षा आम्हाला मोठे काही नाही. तुम्हाला काही द्वेष, राग असेल, तर तो नंतर बघा. गोरगरिबांच्या लेकरांनी काय केले? असा सवालही त्यांनी केला. तरुणांचा आत्महत्येचे राजकारण करू नका ज्या मागण्या झाल्या, त्यांची पुढील दोन दिवसांत अंमलबजावणी करा. जाणूनबुजून तुम्ही काम करत नाहीत. तुम्ही फक्त देतो म्हणता आणि देत नाहीत, याचा अर्थ तुम्ही जाणूनबुजून मराठा तरुणांच्या आत्महत्येचे राजकारण करत आहात, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला. त्यांच्या बलिदानावर खेळू नका. तुम्ही तातडीने मागण्यांची अंमलबजावणी करा, ही विनंती करतो, असेही ते म्हणालेत. कराडजवळील पैसे एखाद्या मंत्र्याचे असतील
मनोज जरांगे यांनी यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही भाष्य केले. देशमुखांची हत्या करणारी टोळी विचित्र आहे. ती टोळी संपलीच पाहिजे. फरार आरोपी कृष्णा आंधळेला यांनी पळवले, असे वाटत आहे. खंडणी मागणारी, खून करणारी, छेडछाड करणारी, घर बळकवणारी, जमीन बळकवणारी, अशा वेगवेगळ्या टोळ्या आहेत. या पैशांवर राजकारण करायला मजा वाटली. संपूर्ण संपत्ती एखाद्या मंत्र्याची आहे. वाल्मीक कराडला इतक्या पैशांचे काय करायचे? असे मनोज जरांगे म्हणाले.