नागपूर : दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात रोहित शर्माने दणदणीत फटकेबाजी केली खरी, पण सर्वांच्या लक्षात राहीला तो दिनेश कार्तिक. कारण फक्त दोन चेंडूंमध्ये कार्तिकने यावेळी सामना संपवलाा. अखेरच्या षटकात दोन चेंडूंमध्ये १० धावांची वसूली करत त्याने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण या अखेरच्या षटकाच्या वेळी त्याच्या मनात नेमकं काय सुरु होते, ते त्याने सामना संपल्यावर सर्वांना सांगितले.

दिनेश फलंदाजीला आला तेव्हा भारताला विजयासाठी ६ चेंडूंत ९ धावांची गरज होती. दिनेशने यावेळी कसलाच विचार केला नाही, त्याने पहिल्या चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर दिनेश थांबला नाही. त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवर दिनेशने चौकार लगावला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पण यावेळी दिनेशच्या मनात नेमकं काय सुरु होतं, ते त्याने यावेळी सांगितले.

अखेरच्या षटकाविषयी दिनेश म्हणाला की, ” मला वाटलं की, अखेरचे षटक यावेळी जोश हेझलवूड टाकेल. पण जोश गोलंदाजीला आला नाही आणि डॅनिलय सॅम्मच्या हाती मी चेंडू पाहिला. पण तरीही मी माझ्या रणनितीवर कायम राहिलो. हा सामना आपण संपवायचा आणि भारताला विजय मिळवून द्यायचा, हे मी ठरवले होते. या गोष्टीची अंमलबजावणी मला करता आली आणि भारताला विजय मिळवून देता आला, याचा मला अभिमान आहे. रोहितने या सामन्यात दमदार फटकेबाजी केली, तर अक्षरने भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे आता हैदराबादमध्ये तिसरा सामना चांगलाच रंगेल.”

रोहित शर्माने आजच्या सामन्यात कोणती चूक सुधारली, जाणून घ्या…
गेल्या काही दिवसांमध्ये रोहित हा अपयशी ठरत होता. पण आजच्या सामन्यात तो यशस्वी ठरला. गेल्या काही सामन्यांमध्ये रोहित हा फलंदाजीला आल्यापासून पहिल्याच चेंडूपासून मोठे फटके मारण्यासाठी प्रयत्न करायचा. पण ही चूक त्याने आजच्या सामन्यात केली नाही. ही चुक त्याने आजच्या सामन्यात सुधारली. पहिले तिन्ही चेंडू तो शांत होता. त्यानंतर रोहितने एक षटकार मारला. त्यानंतरही रोहित जास्त आक्रमक झाला नाही. त्यानंतर थेट दुसऱ्या षटकात त्याने षटकार खेचला. रोहित हा असा फलंदाज आहे की, तो स्थिरस्थावर झाल्यावर मोठी फटकेबाजी करतो आणि हीच गोष्ट रोहितने यावेळी करून दाखवली. त्यामुळे रोहित या सामन्यात यशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.