मुंबई : अभिनेता उमेश कामत काही दिवसांपूर्वी लंडनला मराठी सिनेमाचं शूटिंग करत होता. सोनाली खरेची पहिली निर्मिती असलेला सिनेमा ‘Myलेक’चं शूटिंग आटपून तो कधीच मायदेशी परतलाही. पण आता त्यानं एक फोटो शेअर केला आहे. त्याला अनेक चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

उमेशनं शूट सुरू होण्याआधी क्लिपिंग केलं जातं, तो फोटो शेअर केला आहे. उमेशनं म्हटलंय, ‘दिग्दर्शक अॅक्शन म्हणण्याच्या आधीचा क्षण. त्या काही सेकंदात तुम्ही बाहेरच्या जगाला पूर्ण बंद करून टाकता आणि स्क्रीनवर दिसणाऱ्या व्यक्तीत शिरता.’ उमेशनं कलाकाराचं मनोगतच या पोस्टमधून सांगितलं आहे.

स्वप्निल जोशीनं दाखवलं त्याचं सर्वात आनंदाचं ठिकाण, चाहते म्हणतायत आम्हालाही इथे यायचंय!

या सिनेमात उमेश मुख्य भूमिकेत आहे. सोनाली खरेनंच सिनेमाची निर्मिती केली आहे, ‘Myलेक.’ सोनाली खरेनं मदर्स डेच्या दिवशी ‘Myलेक’ सिनेमाचं पोस्टर शेअर केलं होतं आणि मदर्स डे माझ्यासाठी खास असल्याचं म्हटलं होतं. आई-मुलाच्या नात्यावरचा हा सिनेमा आहे. सिनेमाच्या मुहूर्ताचा व्हिडिओही शेअर केला आहे.

उमेश कामतही सोशल मीडियावर सक्रिय असतो. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तो आणि अभिनेता आशुतोष गोखले तुफान नाचतायत. एखाद्या हाॅटेलमध्ये ते दिसतायत आणि अचानक डान्स करायला सुरुवात केली. या व्हिडिओबरोबर उमेशन कॅप्शन पोस्ट केली आहे. वि.द. घाटे यांचं वाक्य आहे, थोडे वेडे व्हा वेडे. मनमोकळं रडा, मनमोकळं हसा. ते लिहून कंसात उमेशनं लिहिलंय, मनमोकळं नाचा- मी.

अशोक सराफ त्यावेळी असे वागले म्हणून…रवी जाधव कधीही विसरू शकत नाहीत ती भेट

नुकताच प्रिया बापटचा वाढदिवस झाला. त्या वेळीही उमेशन व्हिडिओ शेअर केला होता. प्रिया-उमेश वेगवेगळ्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. कधी सुट्टी एंजॉय करताना तर कधी सेटवरील फोटोशूट दरम्यान काढलेले छोटे-छोटे व्हिडिओ एकत्र करुन हे रील बनवलेले आहे. त्यात प्रिया-उमेशचा रोमँटिक किसही आहे. प्रियाच्या त्याचप्रमाणे या जोडीच्या चाहत्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

प्रसाद ओक करणार प्रार्थना बेहेरे आणि स्वप्नील जोशीची सुटकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.