रस्ता रूंदीकरण, संरक्षण कठडे, एसटीच्या फेऱ्या तातडीने वाढवा:सेमाडोह अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी घेतली बैठक

रस्ता रूंदीकरण, संरक्षण कठडे, एसटीच्या फेऱ्या तातडीने वाढवा:सेमाडोह अपघाताच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी घेतली बैठक

सेमाडोह येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधित यंत्रणाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीतील निर्णयानुसार शक्य असलेल्या ठिकाणी रस्त्यांचे रूंदीकरण, पुलांवर संरक्षण कठडे आणि एसटी बसेसच्या फेऱ्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. गेल्या आठवड्यात चावला कंपनीची खाजगी बस पुलावरुन दरीत कोसळल्याने दोन महिला डॉक्टरांसह चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अपघात का झाला, हा मुद्दा चर्चेला येऊन तेथील रस्त्यांच्या अडचणीही पुढे आल्या होत्या. पुढे राजकीय पुढाऱ्यांसह अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी या विषयाला ताणून घेत यंत्रणेच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले होते. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करुन आजची बैठक घ्यावी लागली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह वन व परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कटियार यांनी, मेळघाटातील अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, आरटीओ आणि परिवहन महामंडळातर्फे एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. परिवहन महामंडळाच्या बसेसची संख्या आणि वेळेवर बसेस नसल्यामुळे नागरिकांना खासगी बसेसमधून नाईलाजाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांच्या गरजेनुसार बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात असे सांगण्यात आले. मेळघाटातील रस्ते अरूंद आहेत. वळणे अनेक असल्याने त्याठिकाणी अपघाताची शक्यता अधिक असते. परिणामी आवश्यक त्या ठिकाणी फलक लावण्यात यावेत. रस्ता रूंदीकरण आणि अपघात प्रवण क्षेत्रात संरक्षक कठडे उभारण्यात यावेत. अपघातासाठी खासगी वाहनांचा अतिवेग हे कारण असल्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत वाहनांची तपासणी करावी. अतिवेगासोबतच मर्यादेपेक्षा जादा प्रवासी असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशा सूचनादेखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. साबांविला मागितला रुंदीकरणाचा प्रस्ताव वन विभागाच्या परवानगी अभावी नवीन रस्त्यांचे कामे करणे शक्य नाही. मात्र खडीकरण करून रस्ते रूंद करणे तातडीने शक्य आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. त्यामुळे भविष्यात रूंद रस्ते तयार होण्यास मदत होईल. यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू करावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.

​सेमाडोह येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधित यंत्रणाप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीतील निर्णयानुसार शक्य असलेल्या ठिकाणी रस्त्यांचे रूंदीकरण, पुलांवर संरक्षण कठडे आणि एसटी बसेसच्या फेऱ्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. गेल्या आठवड्यात चावला कंपनीची खाजगी बस पुलावरुन दरीत कोसळल्याने दोन महिला डॉक्टरांसह चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अपघात का झाला, हा मुद्दा चर्चेला येऊन तेथील रस्त्यांच्या अडचणीही पुढे आल्या होत्या. पुढे राजकीय पुढाऱ्यांसह अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी या विषयाला ताणून घेत यंत्रणेच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले होते. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करुन आजची बैठक घ्यावी लागली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह वन व परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कटियार यांनी, मेळघाटातील अपघात रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम, आरटीओ आणि परिवहन महामंडळातर्फे एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगितले. परिवहन महामंडळाच्या बसेसची संख्या आणि वेळेवर बसेस नसल्यामुळे नागरिकांना खासगी बसेसमधून नाईलाजाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे एसटी महामंडळाने प्रवाशांच्या गरजेनुसार बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात असे सांगण्यात आले. मेळघाटातील रस्ते अरूंद आहेत. वळणे अनेक असल्याने त्याठिकाणी अपघाताची शक्यता अधिक असते. परिणामी आवश्यक त्या ठिकाणी फलक लावण्यात यावेत. रस्ता रूंदीकरण आणि अपघात प्रवण क्षेत्रात संरक्षक कठडे उभारण्यात यावेत. अपघातासाठी खासगी वाहनांचा अतिवेग हे कारण असल्यामुळे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसोबत वाहनांची तपासणी करावी. अतिवेगासोबतच मर्यादेपेक्षा जादा प्रवासी असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशा सूचनादेखील जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. साबांविला मागितला रुंदीकरणाचा प्रस्ताव वन विभागाच्या परवानगी अभावी नवीन रस्त्यांचे कामे करणे शक्य नाही. मात्र खडीकरण करून रस्ते रूंद करणे तातडीने शक्य आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. त्यामुळे भविष्यात रूंद रस्ते तयार होण्यास मदत होईल. यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू करावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment