मुंबई :शेअर बाजार गुंतवणूकदारांना चढ-उताराच्या काळात आता या नवीन आठवड्यात कमाईची संधी मिळणार आहे. बाबा रामदेव यांची एकमेव सूचीबद्ध कंपनी पतंजली फूड्स लिमिटेड पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना लाभांश म्हणजेच नफ्यातील काही भाग वितरित करणार आहे. अलीकडेच कंपनीच्या संचालक मंडळाने २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर ५ रुपये लाभांश जाहीर केला होता. याची रेकॉर्ड डेट २६ सप्टेंबर २०२२ निश्चित करण्यात आली आहे. त्याचवेळी, २४ आणि २५ सप्टेंबर रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे एक्स-डिव्हिडंडची तारीख २३ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे.

५० हजार कोटींचा मार्केट कॅप
अलीकडेच पतंजली फूड्सचा स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलाने ५० हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १,४१५ रुपये आहे. मात्र, आता शेअरमध्येही नफा-वसुली होताना दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी बाबा रामदेव यांचा पाठिंबा असलेला हा स्टॉक बीएसईवर रु. १,३३८.४५ वर बंद झाला.

कमाईची आणखी एक संधी; कंडोम बनवणारी दिग्गज फार्मा कंपनी IPO आणणार, SEBI कडे अर्ज दाखल
स्टॉकची कामगिरी
गेल्या तीन वर्षांत रामदेव यांच्या कंपनीचा शेअर बीएसईवर ३.५४ रुपयांवरून १३९३ रुपयांपर्यंत वाढला आहे. या अल्प कालावधीत गुंतवणूकदारांना ३९,२५० टक्क्यांपर्यंत परतावा मिळाला आहे.

Vedanta Ltd च्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांपेक्षा जास्त घसरली; गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान
पतंजली समूहाची ही योजना
पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांच्या मते येत्या पाच ते सात वर्षांत समूहाचा व्यवसाय अडीच पटीने वाढून एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. चार समूह कंपन्यांचे प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) देखील घेतले जातील. याशिवाय त्यांचा ग्रुप येत्या काही वर्षांत पाच लाख लोकांना रोजगार देईल असा दावाही बाबा रामदेव यांनी केला. पतंजली समूहाची सध्याची उलाढाल सुमारे ४०,००० कोटी रुपये आहे.

गुंतवणूकदारांना लवकरच कमाईची संधी, ‘या’ ७ कंपन्या डिविडंड देणार
सोमवारी पतंजली फूड्सचे शेअर्स तेजीसह उघडले आणि इंट्राडेमध्ये शेअर बीएसईवर सुमारे १.२० टक्क्यांनी झेप घेऊन १,४१५ रुपयांवर पोहोचला. त्याचप्रमाणे, हा मल्टीबॅगर स्टॉक गेल्या ६ महिन्यांत ४४.६५ टक्क्यांनी वाढला आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना ६३.६७ टक्के परतावा देण्यात आला आहे. तर एका वर्षात हा शेअर सुमारे ३१ टक्क्यांनी वाढला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.