दिव्य मराठी अपडेट्स:वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत भाविकांची मांदियाळी, दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स… LIVE NEWS UPDATES मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत हजारो भाविकांची मांदियाळी वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात हजारो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भारत-पाक संघर्ष पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, राज्य कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण सुरू करण्याची घोषणा केली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी तरुणांमध्ये लवचिकता आणि तयारी बळकट करणे हे उद्दिष्ट असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सविस्तर वाचा मुंबईसह राज्यातील 8 जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा राज्यात पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आठ जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत मुंबई, ठाणे, उपनगर, रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात 70 ते 90 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहून मुसळधार पावसाने झोडपून काढले. सविस्तर वाचा ऑपरेशन सिंदूरमधून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या- शायना एनसी ऑपरेशन सिंदूरमधून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचा दावा शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी केला आहे. पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या हल्ल्यातून आपल्याला या गोष्टी शिकायला मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अचूक हल्ले केले हे, अत्यंत कौतुकास्पद असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सविस्तर वाचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने दादरमध्ये पोस्टर्स पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी केंद्रावर हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली. या सर्व हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. यामुळे पहलगाम येथे मृत्यूमुखी पावलेल्या शहीद पर्यटकांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. या ऑपरेशन सिंदूर बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे कौतुक करणारे पोस्टर्स एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने दादर स्टेशन परिसरात लावण्यात आले आहेत. सविस्तर वाचा शेअर बाजारात आज फ्लॅट ट्रेडिंग आठवड्याचा चौथा ट्रेडिंग दिवस, शेअर बाजारात आज ट्रेडिंग स्थिर आहे. सेन्सेक्स सुमारे ३० अंकांनी घसरून ८०,७०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील २० अंकांनी घसरला आहे, तो २४,४०० वर व्यवहार करत आहे. सविस्तर वाचा