रायगड,पोलादपूर: दीपोत्सवाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या परिचारिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यात पोलादपूर शहर परिसरात प्रभातनगर येथील पवार चाळीत राहत्या खोलीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलादपूर शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये परिचारिका पदावर सेवा करणारी ३५ वर्षी महिला प्रेमलता वामन मेस्त्री हिने प्रभातनगर येथील चाळीतील खोलीमध्ये आतून दरवाजा बंद करून रविवारी सकाळी घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरिक्षक धुमास्कर आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

विहिरीच्या पाणी वाटपाचा वाद शिगेला; रक्तरंजित थराराने शेवट, कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न, काय घडलं?
या घटनेत रविवार, दि. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या पूर्वी मृत महिलेने गळफास लावून आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी येथील या चाळीतील गोविंद गणपत सुतार यांनी खबर दिली आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक माईने यांनी पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 242023 नुसार नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान सदर महिला परिचारिका मानसोपचार तज्ज्ञांमार्फत उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून या घटनेमुळे पोलादपूर शहरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या परिचारिकेचे पतीबरोबर घटस्फोटासंबंधीचे प्रकरण सुरू आहे अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या वादामुळे हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज असला तरीही आत्महत्या करण्यामागचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही.पोलादपूर पोलीस ठाण्याचे श्री धुमास्कर अधिक तपास करत आहेत.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना


Read Latest Maharashtra News And
Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *