घटस्फोटित जावयाला जाळण्याचा एमआयएमच्या नगरसेवकाचा प्रयत्न:छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी सासऱ्याला ठोकल्या बेड्या
आरेफ कॉलनीतील तुझा प्लॉट आमच्या नावावर करून दे, नाही तर तुझ्या आई-वडिलांना जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत ४ महिन्यांपूर्वी फारकत घेतलेल्या एमआयएमच्या स्वीकृत नगरसेवकाने जावयाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. ही घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी उमर खान इलियास अहमद खान (२४, रा. आरेफ कॉलनी, पडेगाव) यांच्या फिर्यादीवरून सासऱ्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबुलाल हाश्मी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हे एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक आहेत. उमर खान इलियास अहमद खान यांच्या फिर्यादीनुसार, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. २०२१ मध्ये उमर खान याने मामा हाश्मी यांच्या मुलीशी लग्न केले होते. परंतु, चार महिन्यांपूर्वी कौटुंबिक वादातून त्यांचा घटस्फोट झाला होता. फिर्यादीची मिटमिटा शिवारातील गट क्रमांक १७९ साडेपाच एकर शेती असून त्यावर प्लॉटिंग केलेली आहे. मात्र, तेथून चोरटे मुरूम चोरुन नेत असल्याने फिर्यादी प्लॉटिंगवर अधूनमधून चक्कर मारत असतात. घर नावावर करून दे, म्हणत रॉडने केली मारहाण २९ सप्टेंबर रोजी प्लॉटिंगवर चक्कर मारून घराकडे जात असताना तिसगाव बायपास रेल्वे उड्डाणपुलाजवळ आरोपी अबुलाल हाश्मी, त्याचा भाऊ अबुल हसन अली हाश्मी, मोहसीन हाश्मी (दोघे रा. शाहीनबाग, आरेफ कॉलनी) यांनी फिर्यादीला अडवले. तुझे घर आमच्या नावावर कर,नाही तर तुझ्या आई-वडिलांना जिवे मारू, असे म्हणत मारहाण केली. मोहसीन आणि अबुल यांनी फिर्यादीला पकडून लोखंडी रॉडने मारहाण केली.