दिव्य मराठी विशेष:अरब देशातून परतलेल्या जालंधरच्या मुलींनी आपबीती सांगितली- एकीला काकूने विकले, दुसरीचे ओमानमध्ये शोषण
अरब देशातील नातेवाईकच दोआबा व मालवा भागातील मुलींची तस्करी करत आहेत. मुलींना ३५ ते ४० हजारांच्या नोकरीचे आमिष दाखवून तेथे बोलावले जाते. विमानतळावर पोहोचताच त्यांचा पासपोर्ट जप्त केला जातो. बोलवलेल्या मुलींना सोबत नेले जाते आणि बंद खोल्यांत कैद केले जाते. कामकाजासाठी गुप्त पद्धतीने बोली लावून त्यांची विक्री केली जाते.इराक, ओमान आणि कतारमध्ये नरक यातना सहन करून परलेल्या ९ मुलींनी ही माहिती दिली आहे. यामध्ये दोन जालंधर जिल्ह्यातील आहेत. राज्यसभेचे सदस्य संत चीचेवाल यांनी त्यांना मायदेशात आणण्यासाठी मदत केली. जालंधर, कपूरथला, फिरोजपूर आणि मोगात परतलेल्या ९ मुलींपैकी तीन शनिवारी निर्मल कुटिया सुल्तानपूर लोधीत पोहोचल्या. त्यांनी आपल्या व्यथा येथे मांडल्या आहेत.
नातेवाईक अन् एजंटांनी ३० ते ४० हजार वेतनाची लालूच देऊन फसवले, छळले
केस-1 | इराकहून जालंधरला परतलेल्या एका गावातील मुलीला महिला ट्रॅव्हल एजंटने एवढा छळ केला की, ती धक्क्यातून बाहेर पडली नाही. मुलीसोबत आलेल्या आईने सांगितले की, मुलीला इराकमध्ये राहणारी तिच्या काकूने ३० ते ४० हजार वेतनाचे लालूच दिले होते. मुलीला एप्रिल २०२४ मध्ये तेथे बोलावले. मुलगी पोहोचल्यानंतर काकूने कुण्या महिला ट्रॅव्हल एजंटला तिला विकले. ४ महिने तिच्याकडून १२-१२ तास काम करून घेतले.
केस-2 | दुसरी मुलगीही जालंधरची रहिवासी आहे आणि तिला ओमानमधून परत आणले. मुलगी जालंधरच्याच एका ट्रॅव्हल एजंटाच्या बहकाव्यात आली. ३५ ते ४० हजार रु. महिने वेतनासाठी सप्टेंबर २०२४ च्या सुरुवातीस ओमानला गेली. तिने सांगितले की, तेथे तिला घरकाम करण्यासाठी पाठवले होते. तेथे तिच्यावर गैरवर्तन आणि शारीरिक शोषण केले. विरोध केल्यानंतर बेदम मारहाण केली. तिने गैरवर्तनाचीही माहिती दिली.
मुलींना आखाती देशांत पाठवू नका : खा.सिचेवाल संत सीचेवाल यांनी पंजाबच्या लोकांना आवाहन केले की, मुलींना या आखाती देशात पाठवू नका. अरब देशांत अडकलेल्या मुलींच्या कथा खूप दु:खद आहेत. ट्रॅव्हल एजंट कसे पीडित मुलींचे नातेवाइक या मुलींना कशा पद्धतीने अरब देशांत नेतात आणि बोलावतात हे सांगितले. मुलींना काही पैशाचे लालूच देऊन फसवले आहे.
नातेवाईक अन् एजंटांनी ३० ते ४० हजार वेतनाची लालूच देऊन फसवले, छळले