दिव्य मराठी विशेष:यूपीआयप्रमाणे देशात आता कर्ज क्रांती आणणार यूएलआय; वर्षापासून सुरू आहे पथदर्शी प्रकल्प

आता तुम्हाला कार, वैयक्तिक किंवा गृहकर्ज आदींसाठी बँकांमध्ये जावे लागणार नाही. फक्त एका क्लिकवर कर्ज मिळेल. त्याची प्रक्रिया यूपीआयसारखीच काही सेकंदांची असेल. यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी युनिफाइड लँडिंग इंटरफेस (यूएलआय) लाँच करण्याची घोषणा केली. यामुळे देशातील कर्जप्रणालीत नवी क्रांती होईल, असे ते म्हणाले. यूएलआय हे रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबने (आरबीआयएच) उर्वरित. पान ५ आधार, पॅन आणि जमिनीच्या नोंदी गोळा करून अर्जदारासाठी कर्जाची क्षमता तपासणार यूएलआय काय आहे? आरबीआय यूपीआयसारखी नवीन प्रणाली आणत आहे, ज्यानंतर युजर्सना ऑनलाइन कर्ज घेणे सोपे होईल. जसे फोनपे, गुगलपे, पेटीएम ॲप्स यूपीआयवर आधारित आहेत, ज्यांचे निरीक्षण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे केले जाते. हेच व्यासपीठ यूएलआय प्रदान करेल.

कसे करेल काम? ई- केवायसी, आधार, जमीन नोंदी, पॅन प्रमाणीकरण, बँका, क्रेडिट कंपन्यांसारख्या विविध स्रोतांकडून डेटा गोळा करेल. याद्वारे, अर्जदाराच्या कर्ज क्षमतेचे मूल्यांकन केले जाईल. संपूर्ण प्रणाली सहमतीच्या आधारावर काम करेल. त्यामुळे डेटा गोपनीय राहील. काय होईल फायदा? कर्ज देणाऱ्या सध्याच्या ॲप्सवर सरकार, आरबीआयचे मर्यादित नियंत्रण आहे. पण यूएलआय आधारित ॲप्स थेट देखरेखीखाली येतील. जसे आता पिन टाकून झटपट पेमेंट करतात तसेच पिन टाकून कर्ज घेऊ शकाल. वेळेचीही खूप बचत यूएलआय कर्जप्रक्रियेला पूर्णपणे ऑनलाईन करेल. पारदर्शकतेसह वेळेचीही खूप बचत होईल. – आदिल शेट्‌टी, सीईओ, बँकबाजार

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment