दिव्य मराठी अपडेट्स:बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीवर दुसरा गुन्हा दाखल दाखल; तर म्हाडा सदनिकांच्या विक्री किंमतीत 10 ते 25% कपात
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीवर दुसरा गुन्हा दाखल दाखल मुंबई – बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीवर दुसरा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दुसऱ्या मुलीच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस आता आरोपीला दुसऱ्यांदा ताब्यात घेण्याची तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. म्हाडाच्या 370 सदनिकांच्या विक्री किंमतीत 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळ सोडतीतील 370 सदनिकांच्या विक्री किंमतीत 10 ते 25 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात येत असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. त्यामुळे आता घर खरेदी करणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. पेन्शनचा निर्णय झाल्याने आजपासून होणारा संप स्थगित मुंबई – १ मार्च २०२४ रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आश्वासित केल्याप्रमाणे राज्यात सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या बैठकीत राजपत्रित अधिकारी महासंघ व मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना दिली. अन्य मागण्यांबाबतही राज्य शासन लवकरच योग्य निर्णय घेईल, त्यामुळे संप आंदोलन करू नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी महासंघ व मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींना केले. जुन्या पेन्शनसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी महासंघाने 29 ऑगस्टपासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन पुकारले होते. ते मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे तूर्त स्थगित करण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे उदगीरला 2 ते 4 सप्टेंबरदरम्यान ड्रोन वापरास बंदी लातूर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधितराखण्यासाठी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुकाहद्दीत 2 सप्टेंबर पासून 4 सप्टेंबर रोजी पर्यंत ड्रोनच्यावापरास बंदी आहे. विना परवाना व बेकायदेशीर ड्रोनप्रक्षेपण आणि ड्रोनचा (तात्पुरता रेड झोन) वापरकरण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीयनागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वयेप्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी तथाजिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. मविआचे ‘पॉवर हाऊस’ आता “मातोश्री’ बंगला मुंबई – महाविकास आघाडीच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. लोकसभेच्या काळात मविआच्या बहुतांश बैठका शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर होत असत. पण आता मातोश्री बंगला पुन्हा नव्या “पॉवर हाऊस’च्या रूपात उदयास येत आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून समोर आणण्याची मविआची रणनीती म्हणून याकडे पाहिले जात आहे. सोमवारी ट्रायडंट हॉटेलमध्ये मविआच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. त्यात उद्धवसेनेने मुंबईतील विधानसभेच्या ३६ पैकी २० ते २२ जागांवर दावा केला. उर्वरित १४ ते १६ जागा काँग्रेस, पवार गटासाठी सोडण्याचे संकेत दिले होते. त्यामुळेच शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी जागावाटपावर चर्चा केली. तीन सप्टेंबरला होऊ शकते आमदार अपात्रता सुनावणी नवी दिल्ली – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवारी, 3 सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या संगणकीय वेळापत्रकात ही दोन्ही प्रकरणे या एकाच दिवशी सुनावणीला ठेवण्यात आली आहेत. उद्धवसेना आणि शरद पवार गटाने आपल्या पक्षाच्या बंडखोर आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. दरम्यान, शिंदेसेनेला शिवसेना पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध उद्धवसेनेच्या याचिकेवर 17 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे, तर अशा प्रकारच्या शरद पवार गट, अजित पवार गटाच्या याचिकेवर 12 नोव्हेंबर तारीख देण्यात आली आहे.