दिव्य मराठी अपडेट्स:अक्षय शिंदेच्या वडिलांची उच्च न्यायालयात धाव; याचिकेवर आज तातडीची सुनावणी होणार
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स जम्मू-काश्मीर : आज 26 जागांसाठी 25 लाख मतदार करणार मतदान श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील 5 लाख मतदार बुधवारी 6 जिल्ह्यांतील 26 विधानसभा जागांवर मतदान करणार आहेत. त्यापैकी जम्मू प्रदेशात 11 तर काश्मीरमध्ये 15 जागा आहेत. कलम 370 हटवल्यानंतर येथे प्रथमच निवडणूक होत आहे. 2014 मध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर यापैकी 25 जागांवर 59 टक्के मतदान झाले. यावेळी नव्या जागांची भर पडली आहे. राज्यात एकूण 19 जागा आहेत. पहिल्या टप्प्यात 24 जागांवर विक्रमी 61.38% मतदान झाले होते. तिसऱ्या टप्प्यात 1 ऑक्टोबरला 40 जागांसाठी मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. झेडपीच्या शाळा आज राहणार बंद; राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा
नगर – राज्यभरातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी शासनाशी, शिक्षण समन्वयक समितीने चर्चा केली. परंतु, काही मुद्द्यांवर एकमतन झाल्यामुळे बुधवारी, 25 सप्टेंबरला शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनांनी घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना अघोषित सुट्टी असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप म्हणाले, शिक्षक संघटनांच्या मागण्यांबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत समन्वय समितीची बैठक झाली. यात शिक्षकांनी मांडलेल्या काही मागण्यामान्य झाल्या. परंतु, शाळाबाह्य कामाबाबत शासन काहीच बोलायला तयार नाही. त्यानुसार सर्वसंघटनांच्या ऑनलाइन बैठकीत शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरमध्ये सकाळी 11 वाजता आनंद विद्यालय येथून शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.
सकल मराठा समाजातर्फे उद्या सोलापूर बंदची हाक सोलापूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील हे अंतरवाली सराटी (जालना) येथे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे, तरीही सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही, त्यामुळे जरांगे यांच्या समर्थनासाठी 26 सप्टेंबर रोजी सोलापूर बंदची हाक दिल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी मंगळवारी दिली. पत्रकार परिषदेला राजन जाधव, विनोद भोसले, महादेव गवळी, विलास लोकरे, ज्ञानेश्वर सपाटे आदी उपस्थित होते. तुळजाभवानी मातेच्यामंचकी निद्रेला प्रारंभ, गाद्यांचा कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम समाजाला तुळजापूर – तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस मंगळवारी ( 24 सप्टेंबर ) प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदिच्या पलंगावर विसावली. मातेच्या मंचकी निद्रेसाठी गाद्यांचा कापूस पिंजण्याचा मान मुस्लिम समाजाला आहे. शमशोद्दी नपिंजारी यांच्याकडे परंपरागतपणे ह ामान चालत आलेला आहे. त्यांना गाद्यांचा कापूस पिंजला. आजपासून तीन दिवस चित्रकलेच्या एलिमेंटरी अन् इंटरमीजिएटची परीक्षा छत्रपती संभाजीनगर – कला संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी, इंटरमीजिएट या चित्रकला परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या 25 ते 28 सप्टेंबर दरम्यान या परीक्षा होतील. एकूण 4 विषयांच्या प्रश्नपत्रिका असतील. देशातील एकूण 5 राज्यांमध्ये या परीक्षा होणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात सुमारे 35 हजार विद्यार्थी सकाळी आणि दुपारच्या दोन सत्रांत या दोन्ही परीक्षा देणार आहेत. अजिंठा-वेरूळ महोत्सव : अध्यक्षपदी गोवारीकर छत्रपती संभाजीनगर – येत्या 15 ते 19 जानेवारीस दहाव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे, तर महोत्सवाच्या संचालकपदी चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांची नियुक्ती केली आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन व यशवंतराव चव्हाण जिल्हा केंद्र प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशनतर्फे हा महोत्सव होत आहे. महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व मार्गदर्शक अंकुशराव कदम यांनी ही घोषणा केली. मुंबई विद्यापीठ सिनेट; 70 टक्के मतदान मुंबई – उद्धवसेनेसह भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत मंगळवारी 70 टक्के मतदान झाले. मतदार नोंदणी व यादीवर आक्षेप, राजकीय आरोप–प्रत्यारोप, न्यायालयातील लढाई, लोकसभेची आचारसंहिता, एका वर्षात दोनदा स्थगिती आदी विविध कारणांमुळे रखडलेली ही निवडणूक दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर होत असल्याने मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. यात उद्धवसेनेची युवा सेना विरुद्ध अभाविप अशी थेट लढत आहे. एकूण 28 उमेदवार 10 जागांसाठी रिंगणात आहेत. 13 हजार 406 नोंदणीकृत पदवीधर मतदार आहेत. 27 सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे. युवा सेनेतर्फे पुण्यात एकांकिका स्पर्धा पुणे – युवा सेना आयोजित हिंदुहृयदसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला 26 सप्टेंबर रोजी सुरुवात होत आहे. स्पर्धेत 31 संघांनी सहभाग नोंदवला असून हैदराबाद येथील संघही मराठी एकांकिका सादर करणार आहेत. 28 सप्टेंबरपर्यंत बालगंधर्व रंगमंदिरात सादरीकरण होईल. बीडला धावत्या दुचाकीवर वीज पडून 2 तरुणांचा मृत्यू बीड – धावत्या दुचाकीवर वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना, बीड शहराजवळ रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही तरुण हे अर्धमसला (ता. गेवराई) येथील रहिवासी आहेत. बाबुराव पिंपळे (32) व लहू खरात (33) अशी मृतांची नावे आहेत. बीड परिसरात मंगळवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या वेळी बीडजवळ एका शोरूममध्ये कामाला असलेले दोघे काम आटोपून दुचाकीने गावी जात असताना त्यांच्यावर वीज कोसळली. यात दोघे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.