दिव्य मराठी अपडेट्स:काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे आज सांगली दौऱ्यावर
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण आज मुंबई – शिक्षण, राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे माजी मंत्री व भारती विद्यापीठाचे संस्थापक-कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज होणार आहे. डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना, मोहनराव कदम नगर वांगी ता. कडेगाव जि. सांगली येथे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. मालेगावमध्ये उद्या शेतकरी मेळावा सटाणा – नाशिक जिल्ह्यातील डाळिंब व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोजी एनएचएम अंतर्गत उद्या बालाजी लॉन्स मालेगाव येथे सकाळी दहा वाजता जिल्हास्तरीय डाळिंब मेळावा व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मालेगाव तालुक्यातील कांदा, डाळिंब व फळपिकांचे उत्पादन घेणारे शेतकरी गट, एफपीओ उपस्थित राहणार आहेत. पुण्यात गणेशोत्सवात जड वाहनांना 5 ते 18 सप्टेंबर कालावधीत बंदी पुणे – गणेशोत्सवात शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना मध्य भागात बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार 5 ते 18 सप्टेंबर कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असून, वाहन चालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन वाहतूक उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. गणेशोत्सवात नागरिकांसह वाहन चालकांनी एकमेकांना सहकार्य करून उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विशेषतः व्यापारी, उद्योजकांनी आपली जड वाहने शहराबाहेर अनलोड करावी, जेणेकरून कुणाचाही गैरसोय होणार नाही, असे झेंडे यांनी सांगितले. सांगलीचे भाजप आमदार गाडगीळांचा थेट निवडणूक न लढण्याचा निर्णय सांगली – एकीकडे सर्वच राजकीय पक्षांमध्ये विधानसभा उमेदवारीसाठी प्रचंड स्पर्धा आहे. पक्षांतर होत आहे. दुसरीकडे भाजपचे सांगलीतील विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षाकडे उमेदवारी मागणार नाही. पक्ष ज्या कुणाला उमेदवारी देईल, त्याचा पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. 2014, 2019 मध्ये ते सांगलीतून विजयी झाले होते. निवडणूक न लढवण्यामागचे कारण मात्र त्यांनी निवेदनात स्पष्ट केलेले नाही. सोन्याच्या तारांना चांदीचा रंग देऊन तस्करी, 62 लाखांचे सोने पकडले नागपूर – नागपूर विमानतळावर सोन्याच्या तारांना चांदीचा रंग देऊन तस्करी करणाऱ्यांचा डाव सीमा शुल्क विभागाच्या पथकाने उधळून लावला. दोन प्रवाशांच्या दोन ट्रॉलीबॅगमधून 24 कॅरेटचे 384.100 ग्रॅम आणि 475 सोने पकडण्यात आले. कतार एअरवेजने (फ्लाइट क्र. क्यूआर-590) दोहाहून नागपूरला जात असलेल्या दोन प्रवाशांकडून सोने जप्त केले आहे. सोन्याच्या तारांना चांदीचा रंग देऊन ही तस्करी केली जात होती. त्यामुळे बॅगेज स्क्रीनिंग करताना हा प्रकार सहसा लक्षात येत नाही. मात्र पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाल्यामुळे त्यांनी संबंधित प्रवाशाच्या दोन बॅगा तपासल्या. या सोन्याची किमंत 61,25,549 रुपये आहे. यापूर्वी 6 ऑक्टोबर 2023 रोजी महिला प्रवाशाने खास तयार केलेल्या बेल्टमध्ये लपवून आणलेले 72 लाखांचे सोने पकडले होते, तर 29 सप्टेंबर 2023 रोजी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेस्ट स्वरूपात सोने लपवून आणणाऱ्या दोघांना अटक केली होती. भारतीय पासपोर्टधारक ही महिला प्रवासी शारजाहून नागपूरला एअर अरेबियाच्या विमानाने प्रवास करीत होती. तिच्याकडून 72 लाख 29 हजारांचा 1.270 किलोग्रॅम 24 कॅरेट बारीक सोन्याचा बेल्ट जप्त केला होता.