दिव्य मराठी अपडेट्स:संभाजीनगरमध्ये आज पंतप्रधान मोदी – उद्धव ठाकरे यांच्या तर नांदेडमध्ये राहुल गांधी यांची सभा

दिव्य मराठी अपडेट्स:संभाजीनगरमध्ये आज पंतप्रधान मोदी – उद्धव ठाकरे यांच्या तर नांदेडमध्ये राहुल गांधी यांची सभा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स संभाजीनगरमध्ये आज पंतप्रधान मोदी – उद्धव ठाकरे यांच्या सभा छत्रपती संभाजीनगर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांच्या गुरुवारी छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी सभा होणार आहेत. मोदी यांची सभा सकाळी 11.30 वाजता चिकलठाणा एमआयडीतील ग्रॅहम फर्थ कंपनीच्या मैदानावर, तर ठाकरे यांची सभा सायंकाळी 6 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होईल. दोन्ही नेते एकाच दिवशी शहरात प्रचारसभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. राहुल गांधी यांची आज नांदेडमध्ये सभा, ‎मोंढा मैदानावर 2 वाजता संवाद साधणार‎ नांदेड – कॉँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची आज‎14 रोजी नांदेडमध्ये सभा होत आहे. दुपारी 2 वाजता‎‎मोंढा मैदानात ते पदाधिकारी आणि‎‎कार्यकर्त्यांशी संवाद साधतील,‎‎अशी माहिती तेलंगणाचे माजी मंत्री‎‎शब्बीर अली यांनी दिली.‎‎त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी‎‎रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना‎पटोले हे नेतेही नांदेडमध्ये येणार आहेत. या नेत्यांच्या‎पाठोपाठ पुढील पाच दिवसांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री‎हेमंत रेड्डी यांचीही सभा नांदेडमध्ये होईल. लवकरच‎त्याची माहिती देण्यात येणार आहे.‎ उद्धव ठाकरे यांची आज कन्नडमध्ये‎सभा, गिरणी ग्राउंडवर साधणार संवाद‎ कन्नड – कन्नड-सोयगाव मतदारसंघातील‎महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंग राजपूत‎‎यांच्या प्रचारार्थ, शिवसेना पक्षप्रमुख‎‎उद्धव ठाकरे यांची आज (14‎‎नोव्हेंबर) शहरातील गिरणी ग्राउंडवर‎‎दुपारी 2 वाजता सभा होणार आहे.‎‎कन्नड-सोयगाव मतदारसंघात‎‎आमदार राजपूत, अपक्ष उमेदवार‎हर्षवर्धन जाधव, शिंदे सेनेच्या संजना जाधव यांच्यात‎तिरंगी लढत आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‎यांची सभा झाली. त्यानंतर आज ठाकरे येत आहेत.‎ हिंगोलीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह‎यांची उद्या रामलीला मैदानावर सभा‎ हिंगोली – विधानसभा मतदारसंघात महायुतीचे‎‎उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या‎‎प्रचारार्थ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह‎‎यांची शुक्रवारी 15 रोजी सकाळी 11‎‎वाजता रामलीला मैदानावर सभा‎‎आयोजित करण्यात आली आहे. या‎‎वेळी मराठवाड्यातील महायुतीचे‎नेते उपस्थित राहणार असल्याचे महायुतीच्या सूत्रांनी‎ सांगितले. सभेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.‎ ट्रम्पेट चिन्हाचा उल्लेख तुतारी, राष्ट्रीय स्वराज्यच्या उमेदवारावर गुन्हा दाखल सातारा – खटाव-माण मतदारसंघात राष्ट्रीय स्वराज सेनेचे उमेदवार सत्यवान ओंबासे यांना ट्रम्पेट हे चिन्ह मिळाले आहे. पण ते आपले निवडणूक चिन्ह तुतारी आहे, असा उल्लेख करत आहेत. तुतारी वाजवणारा माणूस हे शरद पवार गटाचे चिन्ह आहे. तरीही मतदारांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्यासाठी ओंबासे तुतारी असा प्रचार करत आहेत. अशी तक्रार शरद पवार गट नव्हे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य प्रवक्ते अनिल पवार, सूर्यभान जाधव यांनी केली. वडूज पोलिस ठाण्याला एक प्रचार गाडीही जमा केली. त्यानंतर ओंबासे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. राऊत यांनी व्यापाऱ्यांची माफी मागावी, अन्यथा मतपेटीतून उत्तर; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष गांधींचा इशारा मुंबई – व्यापाऱ्यांबद्दल अपशब्द काढणाऱ्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तत्काळ माफी मागावी, अन्यथा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना त्याची झळ सोसावी लागेल, असा इशारा “महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’ चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिला. व्यापारी, उद्योजक हे देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेचे मुख्य घटक आहेत. अर्थव्यवस्थेत कररूपाने व रोजगार निर्मितीच्या रूपाने सर्वाधिक योगदान देणाऱ्या महत्त्वपूर्ण घटकांच्या बद्दल राजकीय नेत्यांकडून बेजबाबदारपणे विधाने होणे हे राज्याची प्रतिमा खराब करणारी आहे. महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग जगताची जगभरात प्रतिष्ठा आहे. बेछूट विधानामुळे तुमची राजकीय पोळी भाजत असेल. परंतु त्यामुळे राज्याचे भरून न येणारे नुकसान होते. परळीच्या बियाणी खून प्रकरणी आव्हाडांचे धनंजय मुंडेंना आव्हान मुंबई – शरद पवारांचे सर्वात जास्त नुकसान जितंेद्र आव्हाड यांनी केले, अशी टीका दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. त्यावर आव्हाड म्हणाले की, मी काय नुकसान केले ते शरद पवारांनाच विचारा. पण धनंजय मुंडेंबाबत बोलायचं झालं, तर मी खूप बोलू शकतो. फक्त त्याला विचारा डॉ. बियाणींचा खून कुणी केला? हिंमत असेल आणि खऱ्या बापाचं पोरगं असेल, तर उत्तर देईल. नाहीतर आमच्या बहीण आहेत, करुणा मुंडे… त्यांना बाजूला घेऊन बसतो आणि सांगायला लावतो सगळं. एकदा शरद पवारांनी सांगितलंय ना, तुझी किती लफडी होती आणि त्यातून कसं बाहेर काढलंय ते. पीक विमा कंपनीकडून‎अग्रिम वाटपास दिरंगाई‎ परभणी‎ – मानवत तालुक्यातील ताडबोरगाव‎खरीप हंगामात पीक विमा संरक्षित‎केलेल्या क्षेत्राला, अग्रिम नुकसान‎भरपाई मिळणार आहे. मात्र याबाबत‎आदेश प्राप्त होऊन देखील अग्रिम‎रक्कम वाटप करण्यात आलेली‎नाही. विमा कंपनीकडून अग्रिम वाटप‎करण्यात दिरंगाई केली जात‎असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला‎आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि‎रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे‎लागवड ते काढणी पश्चात पिकांचे‎नुकसान टाळण्यासाठी शेतकरी पीक‎विमा घेतात. यावर्षी तालुक्यात‎अतिवृष्टी झाली. यामुळे पिकांचे मोठे‎नुकसान झाले. या नुकसानीचा‎पंचनामा करण्यात आला होता.‎यानुसार सोयाबीन, कापूस व तूर या‎पिकांची नुकसान भरपाई प्रशासनाने‎अग्रिम रक्कम देण्याचा निर्णय‎घेतला. हा निर्णय होऊन एक‎महिन्याचा कालावधी लोटला. तरी‎अजूनही अग्रिम रक्कम वाटप‎करण्यात आली नाही. दिवाळीचा‎सण झाला तरी रक्कम वाटप‎करण्यात हालचाल दिसून येत नाही.‎यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.‎नुकसान भरपाई तातडीने वितरित‎करण्याची मागणी आहे.‎ पुण्यात यंदा 14 ते 22 डिसेंबरदरम्यान पुस्तक महोत्सवाचे आयोजन पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे मागील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या आणि दिल्लीपाठोपाठ देशातील सगळ्यात मोठा पुस्तक महोत्सव म्हणून नावाजलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला मिळालेल्या भरघोस यशानंतर यंदा देखील पुणेकरांसाठी हा महोत्सव त्याच भव्य दिव्य पध्दतीने दिनांक 14 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित केला आहे. मृतदेहाचे सात तुकडे करून हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून खुनाचा संशय मुंबई – मुंबईतील गोराई येथे एका तरुणाचा मृतदेह मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. मृतदेहाचे सात तुकडे करून एका गोणीत भरले होते, ही गोणी रविवारी आढळून आली. आंतरधर्मीय संबंधांतून ही हत्या झाली, असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृत तरूणाचे नाव रघुनंदन पासवान (21) असून तो बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील कन्होली गावातला होता. या गुन्ह्याशी संबंधात एका आरोपीला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, मृत तरुणाचा एक मित्र या गुन्ह्यात सामील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पाथरीत 20 रोजी भरणारे सर्व आठवडी बाजार बंद परभणी – पाथरी विधानसभा मतदारसंघातील सर्व शहरी व ग्रामीण भागात बुधवारी 20 रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाथरी, मानवत व सोनपेठ येथील नगर परिषदांना व ग्रामीण भागासाठी तलाठी, ग्रामसेवकांना याबाबत निर्देश दिले आहेत. मतदानाच्या दिवशी सर्वांना नागरिकांना मतदान करता यावे, म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहला जिवे मारण्याची धमकी, 50 लाखांची मागणी पाटणा – भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्याकडून 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजता दोन वेगवेगळ्या नंबरवरून कॉल आले होते. त्यात अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ करून धमकी दिली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment