दिव्य मराठी अपडेट्स:संतोष देशमुख हत्या प्रकरणात परभणीमध्ये 4 जानेवारी रोजी निघणार सर्वपक्षीय शांतता मोर्चा

दिव्य मराठी अपडेट्स:संतोष देशमुख हत्या प्रकरणात परभणीमध्ये 4 जानेवारी रोजी निघणार सर्वपक्षीय शांतता मोर्चा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स परभणीमध्ये 4 जानेवारी रोजी निघणार सर्वपक्षीय शांतता मोर्चा परभणी – सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी परभणीत 4 जानेवारीला सर्वपक्षीय शांतता मोर्चा काढला जाणार आहे. शहरातील विविध सामाजिक संघटना व व्यापारी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 4 रोजी सकाळी 11 वाजता नूतन विद्यामंदिर जिंतूर रोड येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शांती मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. अद्यापही या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक झालेली नाही. सरपंच देशमुखांची हत्या झाल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे. त्यामुळे या शांती मोर्चाला परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावातून नागरिक उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात प्रमुख मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात येणार आहे. संभाजीनगरसह 11 जिल्ह्यांमध्ये 3 जानेवारीपासून थंडीचा कडाका नाशिक – हिमालयात पुन्हा पश्चिमी चक्रवात येत असल्याने तेथे हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह 11 जिल्ह्यांत 3 ते 7 जानेवारीपर्यंत थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज पुणे हवामान विभागातील निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या 11 जिल्ह्यांत 3 ते 7 जानेवारीदरम्यान थंडीचा कडाका अधिक राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. लोणावळ्यात टायगर व लाइन्स पॉइंट 2 दिवस बंद नाशिक – पर्यटकांचे लोणावळ्यातील सर्वात प्रेक्षणीय आवडते पर्यटनस्थळ असलेले टायगर व लाइन्स पॉइंट्स हे वन्यजीव आणि जैवविविधतेच्या सुरक्षेच्या कारणास्तव 31 डिसेंबर व 1 जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय वन विभागाने घेतला आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यंदा नववर्षाच्या पूर्वसंध्येला शनिवार, रविवार वीकेंड आणि त्यानंतर मधला सोमवारचा दिवस वगळता मंगळवारी थर्टी फर्स्ट (31 डिसेंबर) असा लाँग वीकेंड असल्याने या सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने येथे येण्यास बंदी घातल्याचे कळवण्यात आले आहे. एमएचटी-सीईटी अर्जांसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत पुणे – शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये होणाऱ्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटीची विद्यार्थी नोंदणीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून अर्ज भरण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. सीईटी सेलकडून पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एकूण 19 प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार सीईटी परीक्षा मार्चपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. आ. सदाभाऊ खोत यांनी सोडली मंत्रिपद मिळण्याची अाशा मुंबई – मंत्रिपदावर वर्णी लागली नाही म्हणून रयत क्रांती संघटनेेचे सर्वेसर्वा, आमदार सदाभाऊ खोत कमालीचे नाराज झाले होते. आम्ही नांगराला जुंपलेले बैल आहोत, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अडीच वर्षांनंतर होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला होता. मात्र, सोमवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी मंत्रिपदाची आशा सोडल्याचे दिसून आले. ते म्हणाले की, हे सरकार यावं याकरता आम्ही अाटोकाट प्रयत्न केले. 50 वर्षांच्या काँग्रेसच्या राजवटीत गावगाड्याची फसवणूक आम्ही पाहिली. आता महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे नेतृत्त्व देवाभाऊंच्या रुपाने लाभले आहे. त्याच्यासाठी आम्ही छातीचा कोट करून उभे राहू. आरटीजीएस – 1 एप्रिलपासून प्राप्तकर्त्याचे नाव कळणार मुंबई – एक एप्रिलपासून सर्व बँकांमध्ये आरटीजीएस-एनईएफटी पेमेंटमध्ये ज्याला पैसे पाठवलेत त्या प्राप्तकर्त्याचे नाव पाहता येईल. रिझर्व्ह बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला ग्राहकांचे चुकांपासून संरक्षण करण्यासाठी व फसवणूक टाळण्यासाठी व्यवहार करण्यापूर्वी बँक खात्याचे नाव सत्यापित करण्याची सुविधा विकसित करण्यास सांगितले आहे. सध्या, ‘लूकअप सुविधा’ यूपीअाय आणि अायएमपीएसमध्ये पेमेंट सुरू करण्यापूर्वी प्राप्तकर्त्याच्या नावाची पडताळणी करण्याची सुविधा प्रदान करते. आरबीआयच्या निर्देशानुसार ही सुविधा इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि बँकांमध्ये उपलब्ध असेल. तसेच, लाभार्थी खात्याचे नाव ‘लूकअप सुविधा’ ग्राहकांना शुल्क न घेता उपलब्ध करून दिली जावी. कोणत्याही कारणास्तव लाभार्थीचे नाव प्रदर्शित केले जाऊ शकत नसल्यास पैसे पाठवायचे की नाही हे प्रेषक ठरवू शकेल. देवनार कचरा डेपोतून 7 मेगावॅट वीजनिर्मिती होणार मुंबई- देवनार येथील कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या मुंबई मनपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात आली आहे. मूळ कंत्राटात कचऱ्यापासून प्रतिदिन 4 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार होती. मात्र त्याच कंत्राटांतर्गत आता प्रतिदिन 7 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येईल. हा प्रकल्प ऑक्टोबर 2025 मध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. देवनार क्षेपणभूमी येथे सध्या 20 दशलक्ष मेट्रिक टन कचरा जमा झाला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या‎ लेकापाठोपाठ आईचाही मृत्यू‎ हिंगोली‎ – पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबारात जखमी‎झालेल्या सासूचा उपचार सुरु असताना, सोमवारी 30‎रोजी सायंकाळी मृत्यू झाला. यामुळे या घटनेतील‎मृतांची संख्या आता 3 झाली आहे. रविवारी या‎घटनेतील योगेश धनवे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर‎सोमवारी त्यांच्या आई वंदना धनवे यांनीही‎उपचारादरम्यान प्राण सोडले.‎ वसमत शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी विलास‎मुकाडे याने 25 डिसेंबरला रात्री, हिंगोलीत‎सासुरवाडीला येऊन गोळीबार केला. यामध्ये त्याची‎पत्नी मयुरी मुकाडे यांचा जागीच मृत्यू झाला होता.‎वंदना धनवे यांचे पती मृत वंदना धनवे यांचे पती प्रसाद‎धनवे हे राज्य राखीव दलात कार्यरत होते. कर्तव्यावर‎असतांनाच त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या जागेवर‎वंदना धनवे यांना कक्ष सेविका या पदावर नोकरी‎मिळाली. नोकरी करून त्यांनी योेगेश व मुलगी मयुरी‎यांचा सांभाळ केला होता.‎ तीन वर्षीय श्रीयांशचे मातृछत्र हरपले: आरोपी‎विलास व मयुरी मुकाडे यांना श्रीयांश हा 3 वर्षाचा‎मुलगा आहे. त्याच्या आईचा मृत्यू झाला, तर वडील‎तुरुंगात आहेत. आजी व मामाचाही मृत्यू झाला आहे.‎त्यामुळे त्याचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न आहे.‎ म्हाडा उपाध्यक्षांच्या दालनातधक्काबुक्की, काम बंद आंदोलन मुंबई – म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना पुन्हा एकदा 28 डिसेंबर रोजी धक्काबुक्की झाली. या प्रकरणी 30 डिसेंबर रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही उपाध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्कीच्या दोन घटना घडल्या होत्या. पोलिसांनी सांगितले की, 28 रोजी एक नागरिक उपाध्यक्ष जयस्वाल यांच्याकडे तक्रार घेऊन गेला. ते त्याचे म्हणणे ऐकून घेत असताना त्याने धक्काबुक्की, शिवीगाळही केली. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत कोल्हापूरची ‌यात्रा‌ प्रथम पुणे – महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सने सादर केलेल्या ‌‘यात्रा‌’ एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावला. संघास पाच हजार एक रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले, तर सर्वोकृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेला कुमार जोशी करंडक शहाजी विधी महाविद्यालयाने सादर केलेल्या ‌‘कलम 375’ एकांकिकेने पटकावला. या संघास रोख रुपये चार हजार एक, प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. स्पर्धेत एकूण 18 संघांनी सादरीकरण केले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुप्रसिद्ध अभिनेते, पद्मश्री मनोज जोशी यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, परीक्षक सुषमा देशपांडे, अनिल दांडेकर, वैभव देशमुख मंचावर उपस्थित होते. सतीश वाघ खून प्रकरणामध्ये मोहिनी वाघसह 6 आरोपी येरवडा कारागृहात पुणे – भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा व हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघसह सहा आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. मोहिनी वाघ व अतिश संतोष जाधव यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. वानवडी येथील न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रचेता राठोड यांनी हा आदेश दिला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment