दिव्य मराठी अपडेट्स:मालवणमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा….
मविआच्या वतीने आज मालवण बंदची हाक मालवण – मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. मालवणमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. वामन म्हात्रे यांच्या संदर्भात आज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष मुंबई – वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात आज महत्त्वाच्या घडमोडी घडण्याची शक्यता आहे. वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामिनाला काल मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच या संबंधी निर्णय देण्याचे निर्देश कल्याण न्यायालयाला दिले होते. त्यामुळे या प्रकरणात आता कल्याण न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष असेल. रत्नागिरीमध्ये बलात्कार प्रकरणी पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष रत्नागिरी – रत्नागिरीमध्ये नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. येथे एका ऑटोचालकाने विद्यार्थिनीला पाण्यात अंमली पदार्थ मिसळले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि तिला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. विद्यार्थाीनिने बसस्थानकावरून कॉलेजला जाण्यासाठी रिक्षा केली होती. चालकाची ओळख पटवण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. या प्रकरणात पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळते का? हे पहावे लागेल.

​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा….
मविआच्या वतीने आज मालवण बंदची हाक मालवण – मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर आज मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. मालवणमध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. वामन म्हात्रे यांच्या संदर्भात आज न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष मुंबई – वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात आज महत्त्वाच्या घडमोडी घडण्याची शक्यता आहे. वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामिनाला काल मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. तसेच या संबंधी निर्णय देण्याचे निर्देश कल्याण न्यायालयाला दिले होते. त्यामुळे या प्रकरणात आता कल्याण न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष असेल. रत्नागिरीमध्ये बलात्कार प्रकरणी पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष रत्नागिरी – रत्नागिरीमध्ये नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. येथे एका ऑटोचालकाने विद्यार्थिनीला पाण्यात अंमली पदार्थ मिसळले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि तिला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. विद्यार्थाीनिने बसस्थानकावरून कॉलेजला जाण्यासाठी रिक्षा केली होती. चालकाची ओळख पटवण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. या प्रकरणात पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश मिळते का? हे पहावे लागेल.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment