दिव्य मराठी अपडेट्स:वंचितच्या उमेदवाराच्या वाहनावर पाच जणांची दगडफेक; जखमी अवस्थेत उपचारासाठी नांदेडला हलविले

दिव्य मराठी अपडेट्स:वंचितच्या उमेदवाराच्या वाहनावर पाच जणांची दगडफेक; जखमी अवस्थेत उपचारासाठी नांदेडला हलविले

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स वंचितच्या उमेदवाराच्या वाहनावर पाच जणांची दगडफेक; जखमी अवस्थेत उपचारासाठी नांदेडला हलविले ​​​​​​​हिंगोली – ​​​​​​​हिंगोली ते कळमनुरी मार्गावर सेलसुरा पाटीजवळ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या वाहनावर पाच जणांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी ता. १८ मध्यरात्री दिड वाजता घडली आहे. असून यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. सोलापुरात मतांसाठी पैसे वाटप; 80 हजार जप्त सोलापूर- मतांसाठी पैसे वाटत असल्याच्या संशयावरून 28 वर्षीय तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत 8 पाकिटांसह 500 रुपयांच्या 160 नोटा सापडल्या. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या आदल्या रात्री हा प्रकार उघडकीस आला. रोहन सुनील सोमा (योगेश्वरनगर, जुने विडी घरकुल) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अंमलदार अजित माने (नेम. एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली. रोहन सोमा पैसे वाटप करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी रोहन याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 90 हजार रुपये जप्त केल्याचे सांगण्यात आले. भटक्या विमुक्तांचा सुविधांसाठी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा सातारा – सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील भटक्या विमुक्त समाजाच्या सुमारे 400 लोकांनी वाठार स्टेशन येथे सोमवारी मोर्चा काढला. आम्हाला मूलभूत सुविधांपासून अनेक वर्षे वंचित ठेवले आहे.आमच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे म्हणून येत्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी या साठी हा मोर्चा होता. भटक्या विमुक्त समाजातील गोपाळ समाजाची वस्ती गेल्या 60 ते 70 वर्षापासून वाटा स्टेशन येथे सरकारी जागेवर वसलेली आहे या समाजाने ग्रामपंचायत पासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुकांतून मतदान केल्याची नोंद आहे. शेतकऱ्यांचे पैसे थकवले; 10 व्यापाऱ्यांचे परवाने रद्द सोलापूर – सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री केल्यानंतर 10 व्यापाऱ्यांनी 118 शेतकऱ्यांचे तब्बल 60 लाख रुपये थकवले. शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत बाजार समितीने प्रशासनाने 10 व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली आहे. सोलापूर बाजार समितीत सध्या कांद्याची विक्रमी आवक होत आहे. आंध्र, तेलंगणा व कर्नाटकातील शेतकरीही कांदा विक्रीसाठी आणत आहेत. कांद्याला दरही सध्या चांगला मिळत आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे व्यापाऱ्यांनी थकवल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याचा मेसेज पसरू नये, तात्काळ पैसे दिले जातात हाच संदेश कायम राखण्यासाठी बाजार समितीने कडक पावले उचलत तात्काळ 10 व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. सासऱ्याला मारण्याची‎धमकी; जावयावर गुन्हा‎ परभणी‎ – बायकोला सासरा नांदायला पाठवत‎नाही, याचा राग मनात धरून‎जावयाने सासऱ्याला जिवे मारण्याची‎धमकी दिली. याप्रकरणी कृष्णा‎पांचाळ या जावयाविरुद्ध रविवारी‎नवा मोंढा पोलिस ठाण्यात‎अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.‎ फिर्यादी बालासाहेब पांचाळ (रा.‎बलसा खु.) आणि संशयित कृष्णा‎पांचाळ हे सासरे जावई आहेत.‎रविवारी जावई कृष्णा याने सासरे‎बालासाहेब पांचाळ यांच्याशी‎फोनवर वाद घातला. पत्नीला‎नांदायला का पाठवत नाही, अशी‎जावयाने विचारणा केली असता‎दोघात शाब्दिक वाद वाढला.‎त्यानंतर कृष्णा पांचाळ याने जिवे‎मारण्याची धमकी दिल्याची तक्रार‎बालासाहेब पांचाळ यांनी दिली.‎ 78 हजारांची फसवणूक ;‎मजुराने केली आत्महत्या‎ हिंगोली‎ – हिंगोली शहरातील बावनखोली‎भागातील ऊसतोड मजुराच्या नावे‎80 हजार रुपयांची उचल करून‎हाती 2 हजार रुपयेच दिल्याने‎मजुराने गळफास घेऊन‎आत्महत्या केली. या प्रकरणी‎दोघांवर रविवार, 17 रोजी‎सायंकाळी उशिरा हिंगोली शहर‎पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎झाला आहे. बावनखोली भागातील‎प्रल्हाद आठवले (55) हे‎ऊसतोडीसाठी जातात. संसयित‎विकास गवारे (रा. ब्राह्मणवाडा),‎सागर देवकते (रा. हिंगोली) या‎दोघांनी ऊसतोडीच्या‎ठेकेदाराकडून प्रल्हाद यांच्या नावे‎80 हजार रुपयांची उचल केली.‎दोघांनी आठवले यांना केवळ दोन‎हजार रुपये त्यांना दिले होते.‎ एका विषयात नापास झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या‎ हिंगोली‎ – ‎‎‎ सेनगाव शहरातील जैन‎मंदिराजवळील रहिवासी 21 वर्षीय‎विद्यार्थ्याने, अभियांत्रिकीच्या अंतीम‎वर्षाच्या एका विषयात सतत नापास‎होत असल्याने गळफास घेऊन‎आत्महत्या केली.‎ शंतनू रविंद्र बोराळकर हा विद्यार्थी‎हिंगोली येथे शासकिय तंत्रनिकितेन‎महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो‎अंतीम वर्षाच्या एका विषयात नापास‎झाला होता. त्याने तीन वेळा त्या‎विषयाची परिक्षा दिली, मात्र तो‎उत्तीर्ण झाला नाही. सतत नापास होत‎असल्यामुळे तो अस्वस्थ झाला‎होता. रविवारी 17 रोजी मित्राच्या‎वाढदिवसाला जातो, असे सांगून तो‎घराबाहेर पडला. त्याने त्याचा‎मोबाईल घरीच ठेवला होता.‎सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न‎आल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोध‎सुरू केला. सोमवारी सकाळी‎सेनगाव शिवारातील गट क्रमांक‎457 मध्ये, झाडाला एका तरुणाने‎दोरीने गळफास घेऊन आत्महत्या‎केल्याचे आढळून आले. याबाबतची‎माहिती शेतमजुरांनी दिल्यानंतर‎बोराळकर कुटुंबीयांनी शेतात धाव‎घेतली. पाहणी केली असता मृतदेह‎शंतनू याचा असल्याचे स्पष्ट झाले.‎रवींद्र बोराळकर यांनी सेनगाव‎पोलिसात दिलेल्या माहितीवरून‎अकस्मात मृत्यूची नोंद झाली.‎ मतदानाच्या दिवशी शहरातील शासकीय, खासगी रुग्णालयांची ओपीडी बंद छत्रपती संभाजीनगर – शहरातील शासकीय, खासगी रुग्णालयांची ओपीडी मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, अतिदक्षता सुविधा सुरू राहणार आहे अशी माहिती घाटी, मिनी घाटी रुग्णालय प्रशासनाने पत्र जारी करून अशी माहिती दिली. घाटी रुग्णालयात मतदानाच्या दिवशी म्हणजे बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी 17 आयसीयू बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. मतदार किंवा बूथवरील कर्मचाऱ्यांना सुविधा दिली जाणार आहे, अशी माहिती डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली. तिरुपतीला 2 तासांतच दर्शन मिळणार; व्हीआयपी कोटा बंद अमरावती – आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील दर्शन व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार आहेत. भाविकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन तिरुपती तिरुमला देवस्थान बोर्डने दर्शनासाठी कृत्रिम प्रज्ञा (एआय) आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांना केवळ दोनच तासांमध्ये श्री व्यंकटेश्वराच्या दर्शनाचा लाभ मिळणार आहे. दररोज सुमारे 1 लाख भाविक येत असल्याने सध्या दर्शनासाठी 20 ते 30 तास लागतात. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात प्रसादाच्या लाडूत भेसळीचे तूप वापरावरून वादंग निर्माण झाले होते. त्यानंतर देवस्थानमने प्रसादाच्या व्यवस्थेतही बदल केले आहेत. त्यानंतर बोर्डाची ही पहिली बैठक झाली.
स्पेशल एन्ट्री दर्शनाचा कोटाही बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्डाचे सदस्य श्यामला राव यांनी दिली. व्हीआयपी दर्शनावरूनही नेहमी वाद होत असतात, त्यामुळे यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ नये,असे बोर्डाला वाटत असल्याचे राव यांनी सांगितले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment