दिव्य मराठी अपडेट्स:व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजच्या कर्जाबाबत वेणुगोपाल धूत यांना 1 कोटीचा दंड, 15 दिवसांच्या आत रक्कम भरण्याचे आदेश
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स
इनसायडर ट्रेडिंग: व्ही. एन. धूत यांना 1 कोटीचा दंड नवी दिल्ली – व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजच्या कर्जाबाबतच्या गोपनीय माहितीवर शेअर बाजारात व्यवहार (इनसायडर ट्रेडिंग) केल्याबद्दल बाजार नियामक संस्था सेबीने उद्योगपती तथा व्यवस्थापकीय संचालक वेणुगोपाल धूत आणि इलेक्ट्रोपार्ट्स (इं.) प्रा.लि. आणि व्हिडिओकॉन रिॲलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस 1.03 कोटी रुपयांची नोटीस बजावली असून 15 दिवसांच्या आत ही रक्कम भरण्यास सांगितले आहे. ही रक्कम न भरल्यास अटक करण्याची अथवा संपत्ती जप्त करण्याचा इशारा दिला आहे. सप्टेंबर 2021 मध्ये व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजच्या बाजारातील व्यवहाराबद्दल 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. नांदेड-मनमाड, बल्लारशा-मुंबई रेल्वे लोहमार्गाच्या कामामुळे अंशत: रद्द
छत्रपती संभाजीनगर – लोहमार्गाच्या दुरुस्तीसाठी नांदेड ते मनमाड डेमू (क्रमांक 07777 ) रेल्वे 1 ते 10 ऑक्टोबर दरम्यान नांदेड ते पूर्णा यादरम्यान अंशतः रद्द आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत ही गाडी पूर्णा येथून सुटेल आणि पूर्णा ते मनमाड अशी धावेल. मनमाड ते नांदेड डेमू (क्रमांक 07778) रेल्वे 10 ऑक्टोबरपर्यंत पूर्णा ते नांदेड दरम्यान अशतः रद्द केली आहे. ही रेल्वे मनमाड ते पूर्णा अशी धावेल. बल्लारशा-मुंबई (क्रमांक 11401) नंदीग्राम 1 ऑक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर या कालावधीत दादरपर्यंतच धावेल. दादर ते मुंबई सीएसएमटी यादरम्यान रेल्वे रद्द असेल. लोणारच्या आराखड्यात 64 कोटींची वाढ लोणार – लोणार विकास आराखड्यातील कामे गतीने पूर्ण व्हावीत, यासाठी विकास आराखड्याच्या मूळ किमतीत 64 कोटी 83 लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लोणार विकास आराखड्याची एकूण रक्कम 434 कोटी 61 लाख रुपये झाली आहे. यातून सांडपाणी प्रक्रिया गटार योजना, प्रयोगशाळा स्थापन करणे, लोणार मंठा बायपास बांधकाम करणे आदी विकासकामे करण्यात येणार आहेत. माजी मंत्री वळवी 203 दिवसांनी भाजपतून बाहेर तळोदा – लाेकसभेपूर्वी राहुल गांधी नंदुरबार दौऱ्यावर असताना माजी मंत्री पद्माकर वळवींनी 12 मार्च 2024 राेजी काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केला होता. ते 203 दिवसांत भाजपमधून बाहेर पडले आहेत. आदिवासींच्या आरक्षणावरून त्यांनी तीन दिवसांपूर्वीच भाजपसह मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली हाेती. ते काँग्रेस, शरद पवार गट किंवा उद्धवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवू शकतात. त्यांची कन्या माजी जि. प. अध्यक्ष, माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांच्या सूनबाई सीमाही काँग्रेसकडून इच्छुक आहेत. त्यामुळे पद्माकर वळवींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपचे मंत्री डाॅ. गावितांचे यांचे बंधू राजेंद्र यांनीही भाजपला साेडचिठ्ठी दिली आहे. सावरकरांविरोधात वक्तव्य; राहुल गांधी यांना समन्स नाशिक – स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नव्हे तर माफीवीर असून त्यांनी स्वत:च ही पदवी बहाल करून घेतल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2022 मध्ये हिंगोली येथील जाहीर सभेत केले हाेते. याच्या विराेधात निर्भय फाउंडेशनने नाशिक जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे निरीक्षण नोंदवत राहुल यांना समन्स बजावले आहे. याप्रकरणी राहुल गांधी यांना स्वत: न्यायालयात हजर होऊन म्हणणे मांडावे लागेल. प्रतिनिधीमार्फत म्हणणे मांडता येणार नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत नेमके कधी हजर व्हावे लागेल याची तारीख पडणार आहे, अशी माहिती अॅड. मनोज पिंगळे यांनी दिली. बेरोजगारांसाठी लोहा, मुखेडला उद्योग मेळावा नांदेड – मुख्यमंत्री रोजगार निर्मितीकार्यक्रमाद्वारे 3 ऑक्टोबरला लोहा,कंधार आणि मुखेड पंचायत समितीसभागृहात, सकाळी 10 वाजतामेळाव्याचे आयोजन करण्यात आलेआहे. या तालुक्यातील सुशिक्षितबेरोजगार युवक-युवतींनीमेळाव्यास उपस्थित राहावे, असेआवाहन केले आहे. या मेळाव्यातकर्ज मंजुरीचे प्रस्ताव, अर्जअपलोड करणे, मंजुरीच्याप्रक्रियेबाबत जिल्हा उद्योग केंद्रकार्यालयाचे अधिकारी तसेचबँकेचे अधिकारी मार्गदर्शन करणारआहेत. ही योजना ऑनलाइनपध्दतीने राबविण्यात येत असूनअधिक माहितीसाठी,maha-cmegp.gov.in यासंकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. राजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिटसोसायटी अध्यक्षावर गुन्हा जालना – एका ज्येष्ठ नागरिकाने केलेल्या एफडीचे पैसेदेण्यास टाळाटाळ करून खातेदारास धमकी देणाऱ्या येथीलराजस्थानी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षासह व्यवस्थापक व कॅशियरविरोधात सदर बाजार पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिक केदारनाथ रमनाजी बुधवतयांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, राजस्थानीमल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी शाखा मामा चौक, येथेआपण बचतीची एफडी केली होती. 16 ऑक्टोबर 2023 व26 सप्टेंबर 2024 रोजी बँकेत पैसे काढण्यासाठी गेलो. मात्र,बँकेचे अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियाणी, व्यवस्थापकमनोज चव्हाण, कॅशियर शेख रईस यांनी आपले फिक्सडिपाॅझिटचे 45 हजार 81 रुपये न देता तुला काय करायचे तेकरून घे, असे धमकावून फसवणूक केली. माझी वसुंधरा अभियानात मानवतपालिका मराठवाड्यात तृतीय परभणी – माझी वसुंधरा अभियानाचा सर्वेक्षणअहवाल नुकताच जाहीर झाला. त्याता मानवत नगरपरिषदेने मराठवाडा विभागातून तृतीय क्रमांक पटकावत50 लाखांचे पारितोषिक मिळवले. हिरवळीत वाढ,जैवविविधतेचे संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, हवागुणवत्ता निरीक्षण आणि वायू प्रदूषण कमी करणे,जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी कामे करतमानवत नगर परिषदेने तृतीय क्रमांक मिळवला.