दिव्य मराठी अपडेट्स:पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबई, पालघर दौऱ्यावर; वाढवण बंदराच्या 76 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा….
मोदी 8 दिवसांत दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, आज वाढवण बंदराची पायाभरणी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या मुंबई, पालघर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या 76 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची पायाभरणी केली जाणार आहे. अति-मोठ्या मालवाहू जहाजांना सामावून घेऊन देशाच्या व्यापार आणि आर्थिक वाढीस चालना देणारे जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापित करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहेत. आठ दिवसांपूर्वीच त्यांनी जळगावात लखपती दीदी या कार्यक्रमातून महिला बचत गटाचा मेळावा घेतला होता. राज्यातील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज पुणे – सौराष्ट्र व कच्छ परिसरात अतितीय कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. हा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात प्रवेश करून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे, त्याचप्रमाणे वातावरणाच्या खालच्या भरातील बाऱ्याची द्रोणिका रेषा ही गुजरात ते केरळपर्यंत सक्रिय होत आहे. त्यामुळे गुरुवारी महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. आता आजपासून पुढचे तीन दिवस रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 2 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात वादळी वान्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. पासपोर्ट सेवा पोर्टल 2 सप्टें. सकाळपर्यंत बंद नवी दिल्ली – पासपोर्ट सेवा पोर्टल 29 ऑगस्टच्या रात्री 8 पासून 2 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत तांत्रिक कारणांमुळे बंद राहणार आहे. यादरम्यान एमईए, आरपीओ, बीओआय, डीओपी तसेच पोलिस अधिकाऱ्यांसाठी प्रणाली उपलब्ध नसेल. परंतु एखाद्यास 30 ऑगस्ट ही तारीख मिळाली असल्यास ती रद्द करून पुढे ढकलली जाईल. बांधकामस्थळी सीसीटीव्ही आवश्यक; नवी मुंबई मनपाचा नवा निर्णय नवी मुंबई – शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून या बांधकामांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वनी, वायू प्रदूषण तसेच ब्लास्टिंगबाबत वाढत्या तक्रारींचे योग्य ते निराकरण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. मनपाने याबाबत प्रमाणित संचालन नियमावली अर्थात एसओपी जाहीर केली. बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही आवश्यक करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल असा दावाही त्यांनी केला. नांदेड विद्यापीठाची ३१ ऑगस्टलाहोणारी ‘पेट-2024’ परीक्षा केली रद्द नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचीपीएचडी पूर्व ‘पेट-2024’ परीक्षा वेळापत्रकानुसार 31 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. परंतु याकालावधीमध्ये यूजीसीच्या ‘नीट’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन विद्यापीठाची 31 ऑगस्ट रोजी होणारी पीएचडी पूर्व ‘पेट-2024’ परीक्षा रद्द करण्यात आली आहे.य ाबाबतचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार आहे. संबंधित सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.