दिव्य मराठी अपडेट्स:यंदाही टीईटीची परीक्षा ऑफलाइन; तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… अपडेट्स
अमित शहा महिनाभरात आज तिसऱ्यांदा महाराष्ट्रात मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेल्या 30 दिवसांत तिसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते दुपारी एक वाजता मुंबई, चार वाजता ठाणे, कोकणातील आमदार, खासदार आणि नेत्यांशी संवाद साधणार आहेत. रात्री नऊच्या सुमारास ते मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृहावर महायुतीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची जागावाटपाविषयी बोलणार आहेत. भाजप दावा करत असलेल्या मुंबईतील अनेक जागांवर शिंदेसेनेने दावा सुरू केल्याने महायुतीत तणाव वाढला आहे. तो कमी करण्यासाठी शहा येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभेला महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला होता. 2019 च्या विधानसभेला 105 जागा जिंकणाऱ्या भाजपला केवळ 78 विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळाली. त्यामुळेच शाह महाराष्ट्राबाबत चिंतेत असल्याने सातत्याने येथे दौऱ्यावर येत आहेत. 24, 25 सप्टेंबर रोजी त्यांनी विदर्भ (नागपूर), मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर) आणि उत्तर महाराष्ट्र (नाशिक) येथील नेत्यांकडून वास्तव जाणून घेतले. त्याआधी गणेशोत्सवादरम्यान त्यांनी मुंबईतील नेत्यांची बैठक घेतली. यंदाही टीईटीची परीक्षा होणार ऑफलाइन मुंबई – टीईटीपरीक्षेत यापूर्वी झालेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर टीईटी- 2024 परीक्षेचे आयोजन,निकाल जाहीर करणे यामध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी परीक्षा परिषदेतर्फे विशेष दक्षता घेतली जात आहे. यंदाही ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून प्रत्येक परीक्षा केंद्रातील वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. शिक्षक होण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी महाराष्ट्र परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा-2024(टीईटी) 10 नोव्हेंबर रोजी आहे. 9 सप्टेंबरपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. टीईटी परीक्षा 2018 आणि 2020 यामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या तब्बल 9 हजार 50 0उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. गडचिरोलीत पुन्हा आला रानटी 29 हत्तींचा कळप
नागपूर – गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्तींनी 29 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास प्रथमच गडचिरोली शहराच्या सीमेत प्रवेश केल्याने वन विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. या कळपात आता 29 हत्ती असल्याचे सांगण्यात आले. दुपारी मसेली परिसरात तर सायंकाळी वाकडी व सेमाना देवस्थानच्या मध्यभागातील जंगलात कळपाचा वावर होता. यामुळे वन विभाग व हुल्ला टीमला चामोर्शी मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी काही काळ रोखावी लागली. या भागातील नवरगाव, कोडना, साखरा, गोगाव, महादवाडी, कुन्हाडी आदी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याचे सांगण्यात आले आहे. नांदेडमधील रेल्वेच्या बैठकीलाभुमरे, काळे, कराड यांची दांडी छत्रपती संभाजीनगर – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेडपरिक्षेत्रातील खासदारांच्या बैठकीचेप्रतिवर्षीप्रमाणे, 30 सप्टेंबरलाआयोजन करण्यात आले होते.आपल्या कार्यक्षेत्रात सुविधांबाबतशिफारस करण्यासाठी खासदारांनानिमंत्रित करण्यात आले होते. याबैठकीकडे मराठवाड्यातील छत्रपतीसंभाजीनगरचे खासदार संदीपानभुमरे, जालन्याचे खासदार डॉ.कल्याण काळे व डॉ. भागवत कराडयांनी पाठ फिरवली. खासदार अशोक चव्हाण, खासदारनागेश पाटील आष्टीकर, खासदारफौजिया खान, खासदार संजयजाधव, खासदार अजित गोपछडेआदी या बैठकीला उपस्थित होते. तरबीड, धाराशिव, जालना आणिछत्रपती संभाजीनगर लोकसभामतदारसंघाचे खासदार अनुपस्थितहोते. रेल्वेच्या वतीने विभागनिहायबैठकांचे आयोजन केले जाते.त्यामुळे संबंधित लोकसभा सदस्यबैठकीला नांदेड येथे आवर्जूनउपस्थित होते. मात्र, खासदारांनी याबैठकीकडे पाठ फिरवली. विधानसभेच्या तोंडावर म्हाडा पुणे, मुंबई मंडळ 11500 घरे बांधण्याच्या तयारीत मुंबई – विधानसभेच्या तोंडावर 8 ऑक्टोबरला म्हाडा मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीचा निकाल जाहीर होईल. त्याच वेळी ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आदी ठिकाणच्या अंदाजे साडेसहा हजार घरांसाठीची जाहिरात आचारसंहितेआधी प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने कोकण मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. तर म्हाडाच्या पुणे मंडळाने सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. या सोडतीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. अकोला व अमरावती जिल्ह्यांत भूकंपाचे हादरे अमरावती – लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 31 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाच्या स्मृतिदिनी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी अमरावती व अकोला जिल्ह्यातील काही भागात दुपारी 1 वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे.सोमवारी बसलेल्या धक्क्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत कुठेही मोठे नुकसान झाले नाही. मात्र नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण तयार झाले होते. या भूकंपाची तीव्रता रेश्टर स्केलवर 4.2 नोंदवली असून, त्याची खोलवर तीव्रता तब्बल 13 किलोमीटर असल्याचे नॅशनल सेंटर ऑफ सिस्मोलॉजिकल आणि स्थानिक भूगर्भशास्त्र तज्ज्ञांनी सांगितले.
राम-रहीमला सात वर्षांत 11 व्यांदा पॅरोल मंजूर चंदीगड – हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डेरा सच्चा सौदा प्रमुख राम-रहीमला तीन अटींवर पॅरोल मिळाला. तो सध्या रोहतक येथील सुनारिया तुरुंगात आहे. तुरुंगाबाहेर आल्यानंतर हरियाणात राहता येणार नाही, ही पॅरोलची पहिली अट आहे. दुसरी म्हणजे राजकीय कार्यक्रमात सहभागी होता येणार नाही. तिसरे म्हणजे सोशल मीडियावर निवडणूक प्रचार करता येणार नाही. पॅरोल देण्यामागील कारण काय, असे निवडणूक आयोगाने विचारले होते. त्यात पाच कारण सांगण्यात आली. त्या कारणांच्या आधारे पॅरोल मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. केदारनाथचा नवा मार्ग; अंतर अर्धा किमी वाढेल डेहराडून – केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांसाठी नवीन सुरक्षित चालण्याचा मार्ग तयार केला जात आहे. तो सोनप्रयाग-गौरीकुंडदरम्यान बांधला जात आहे. या रस्त्याने सोमप्रयाग ते गौरीकुंड हे अंतर अर्ध्या किमीने वाढून 22 किमी होईल. त्याचे बांधकाम वेगाने सुरू असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केदारनाथचे दरवाजे बंद होईपर्यंत ते पूर्ण केले जाणार आहे. पुढील वर्षी या मार्गाने भाविक गौरीकुंडावर पोहोचतील. 31 जुलैच्या रात्री ढगफुटीमुळे सोनप्रयागच्या पुढे 5 किमीचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. तात्पुरत्या मार्गाने हा प्रवास पुन्हा सुरू करण्यात आला हाेता.