नवी दिल्लीः फेस्टिव सेल्सचा धमाका सुरू झाला आहे. साउथ कोरियन टेक कंपनी Samsung आता NO MO’ FOMO फेस्टिव सेल घेऊन आली आहे. या सेलमध्ये सॅमसंग गॅलेक्सी स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, लॅपटॉप्स आणि ॲक्सेसरीज, वियरेबल आणि सॅमसंगचे डिजिटल अप्लायन्सेजवर कॅशबॅक आणि दुसरे खास डिस्काउंट मिळणार आहे. दोन किंवा जास्त प्रोडक्ट्स खरेदी वर पाच टक्के अतिरिक्त सूट दिली जात आहे. नवीन ऑफर्सचा फायदा सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, सॅमसंग एक्सक्लूसिव्ह स्टोर्स आणि नवीन सॅमसंग शॉप ॲप वर ग्राहकांना मिळणार आहे. सॅमसंग शॉप ॲप यूजर्सला त्यांच्या फर्स्ट खरेदीवर ४५०० रुपयाची अतिरिक्त सूट सुद्धा मिळणार आहे. तसेच कंपनीच्या प्रीमियम टीव्ही खरेदीवर स्मार्टफोन्स फ्री दिले जाणार आहे.

प्रीमियम सॅमसंग टीव्ही खरेदीवर फ्री मिळतील फोन
कंपनीचे प्रीमियम टीव्ही मॉडल्स द फ्रेम, QLED आणि UHD TVs वर ४८ टक्के सूट मिळत आहे. काही निवडक Neo QLED, QLED, द फ्रेम आणि UHD TVs खरेदीवर ग्राहकांना २१ हजार ४९० रुपये किंमतीचा Galaxy A32 स्मार्टफोन फ्री मिळणार आहे. याशिवाय, टॉप ऑफ द लाइन Neo QLED TVs च्या निवडक 8K मॉडल्स खरेदीवर १०९,९९९ रुपये किंमतीचा Galaxy S22 Ultra फ्री मिळणार आहे.

स्मार्टफोनवर ५७ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट
नवीन सेलच्या दरम्यान ग्राहकांना कंपनीच्या फ्लॅगशीप झेड सीरीज पासून गॅलेक्सी ए सीरीज, गॅलेक्सी एम सीरीज आणि गॅलेक्सी एफ सीरीजवर ५७ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. गॅलेक्सी झेड सीरीजचे फोल्डेबल फोन खरेदीवर ग्राहकांना ५ हजार १९९ रुपये किंमतीचा वायरलेस चार्ज डुओ केवळ ४९९ रुपयात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय, काही निवडक एस सीरीज आणि ए सीरीजच्या फोन्सच्या अॅक्सेसरीजवर ५० टक्के सूट मिळणार आहे.

टॅबलेट्स आणि वियरेबल्सवर इतकी सूट मिळेल
सॅमसंगच्या मिड रेंज आणि प्रीमियम टॅबलेट, वियरेबल आणि ॲक्सेसरीज खरेदीवर ५५ टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आणि नवीन गॅलेक्सी लॅपटॉप खरेदीवर ३० टक्के पर्यंत डिस्काउंट मिळेल. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सवर १५ टक्के पर्यंत अतिरिक्त सूट मिळेल.

वाचाः Lava Blaze Pro : बेस्ट फीचर्सचा लावाचा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत-फीचर्स पाहा

वाचा : फ्लॅगशिप स्मार्टफोनसाठी खूप खर्च करण्याची नाही गरज, Xiaomi 12 Pro 5G वर मिळतोय ‘इतक्या’ हजारांचा ऑफSource link

Leave a Reply

Your email address will not be published.