Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर यंदाची पहिली दिवाळी साजरी होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधील दिवाळी पाडवा कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता बारामतीमधील नागरिकांना आहे.
हायलाइट्स:
- अजित पवारांबाबत बारामतीत उत्सुकता
- दिवाळी पाडवा कार्यक्रमाला उपस्थित राहणार का?
- अजित पवार अनुपस्थित राहण्याची शक्यता?
बारामतीत शनिवारी (दि. ११) रोजी आयोजित शारदोत्सवात सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे हे एकाच व्यासपीठावर आले. ज्येष्ठ नेते शरद पवार यावेळी उपस्थित नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच आजारपणामुळे दिवाळीला भेटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांना डेंग्यू झाल्यानंतर त्यांनी आजारपणामुळे आणखी काही दिवस विश्रांतीची गरज असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले असून त्यानुसार यंदा दिवाळीला भेटणार नसल्याचे स्पष्ट केले.
परंतु त्यानंतर पवार कुटुंबीय पुण्यात एकत्र आले. तेथून उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला रवाना झाले होते. दिल्लीवरून ते पुन्हा बारामतीला आले. शारदोत्सवाला त्यांनी हजेरी लावली. परंतु पाडव्याच्या मुख्य कार्य़क्रमाला ते येतील का, याबद्दल सांशकता व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु उपलब्ध माहितीनुसार ते गोविंदबागेतील कार्यक्रमाला येणार नसल्याचे समजते. दरम्यान रविवारी बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकीय भूमिका वेगळी व कुटुंब वेगळे असे सांगितले. तत्पूर्वी त्यांनी आम्ही पवार कुटुंबिय एकत्र दिवाळी साजरी करू, असेही म्हटले होते. परंतु सध्याच्या राजकीय स्थितीत ते कितपत शक्य होते, याबद्दल सांशकता आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.