तुम्हाला जर या दिवाळी आधी नवा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर शाओमी कंपनीचा दिवाली विथ मी सेल आला आहे. शाओमी कंपनीच्या या सेलमध्ये Xiaomi 11T Pro 5G या स्मार्टफोनला आता पर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत म्हणजेच २८ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. ‘Diwali with Mi’ सेल मध्ये Xiaomi 11T Pro 5G चे ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटला २८ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. तर या फोनला कंपनीने ३९ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच केले होते. या फोन मध्ये ६.६७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आणि 120 W Hyper Charge फास्ट चार्जिंग सपोर्ट दिले आहे. या फोनच्या मॉडलची किंमत आणि सविस्तर फीचर्स पाहा.

​Xiaomi 11T Pro 5G वर मिळणारी ऑफर्स

xiaomi-11t-pro-5g-

Xiaomi 11T Pro 5G चे बेस व्हेरियंट म्हणजेच ८ जीबी रॅम सोबत 128GB स्टोरेजच्या मॉडलला ३४ हजार ९९९ रुपये किंमतीत अमेझॉन आणि शाओमीच्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजला ३६ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजला ३८ हजार ९९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. ICICI बँक, बँक ऑफ बडोदा आणि कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांना हा फोन २८ हजार ९९९ रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येईल.

वाचाः Budget Smartphones आणखी स्वस्तात खरेदीची संधी, या कंपनीच्या फोन्सवर मिळतोय तगडा डिस्काउंट

​Xiaomi 11T Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स

xiaomi-11t-pro-5g-

Xiaomi 11T Pro 5G मध्ये अँड्रॉयड ११ आधारित MIUI 12.5 दिले आहे. यात ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यासोबत डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट मिळतो. डिस्प्लेवर गोरिला ग्लास व्हिक्टसचा सपोर्ट मिळेल. डिस्प्लेची ब्राइटनेस १००० निट्स आहे. यात स्नॅपड्रॅग ८८८ प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी Adreno 660 GPU, 12 जीबी पर्यंत रॅम आणि ३ जीबी व्हर्च्युअल रॅम मिळेल.

वाचाः उद्यापासून वनप्लसचा दिवाळी सेल, १९ हजाराचा स्मार्ट टीव्ही ९ हजार ४९९ रुपयात मिळणार

​Xiaomi 11T Pro 5G चा कॅमेरा

xiaomi-11t-pro-5g-

Xiaomi 11T Pro 5G मध्ये तीन रियर कॅमेरा आहे. प्रायमरी लेन्स १०८ मेगापिक्सलचा सॅमसंग HM2 सेंसर दिले आहे. दुसरा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि तिसरा लेन्स ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. फोन सोबत ५० मेगापिक्सलचा डायरेक्टर मोड मिळणार आहे. फोनच्या कॅमेराने ८ के व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता येते. फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः Budget Smartphones आणखी स्वस्तात खरेदीची संधी, या कंपनीच्या फोन्सवर मिळतोय तगडा डिस्काउंट

​Xiaomi 11T Pro 5G ची बॅटरी

xiaomi-11t-pro-5g-

शाओमीच्या या फोन मध्ये कनेक्टिविटी 5G, 4G LTE, Wi-Fi 6, ब्लूटूथ, GPS/A-GPS/NavIC, NFC, IR ब्लास्टर आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट दिले आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. फोन मध्ये 5000mAh ची डुअल सेल बॅटरी दिली आहे. जी 120W च्या HyperCharge फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, फक्त १७ मिनिटात ही बॅटरी फुल चार्ज होते.

वाचाः आयफोनच्या चार मॉडलपैकी ‘या’ दोन मॉडलमध्ये येतेय ही समस्या, यूजर्सकडून तक्रारीचा पाऊस



Source link

Leave a Reply

Your email address will not be published.